शहराला मिळाले २० हजार डोज; ११६ केंद्रांवर आज लसीकरण

शहराला मिळाले २० हजार डोज; ११६ केंद्रांवर आज लसीकरण
Updated on

नागपूर : महापालिकेला शुक्रवारी लसीचे २० हजार डोस उपलब्ध (Twenty thousand doses of vaccine available) झाले आहेत. शनिवारी शहरातील ११६ केंद्रावरून ही लस दिली (Vaccination to be given from 116 centers) जाणार आहे. १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीचा पहिला व दुसरा डोज घेता येणार आहे. तरुणाईचा उत्साह बघता महापालिकेने आणखी नव्या १० केंद्रांची भर (Addition of 10 new centers) घातली आहे. बुधवारपासून १८ ते २९ वयोगटातील तरुणाईसाठीही लसीकरण सुरू करण्यात आले. त्यामुळे बुधवारी शहरात विक्रमी २३ हजार ७०३ नागरिकांनी लस घेतली. (The-city-of-Nagpur-received-20,000-doses)

गुरुवारी २० हजार २१ नागरिकांनी लस घेतली. परंतु, राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा न झाल्याने शुक्रवारी महापालिकेच्या सर्वच १०३ लसीकरण केंद्रावरून लसीकरण बंद होते. केवळ तीन शासकीय लसीकरण केंद्रावरून लसीकरण सुरू होते. शुक्रवारी लस नसल्याने तरुणाईची निराशा झाली. परंतु, शुक्रवारी राज्य सरकारने लसीचा पुरवठा केला असून, महापालिकेला २० हजार डोज मिळाल्याचे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले.

शहराला मिळाले २० हजार डोज; ११६ केंद्रांवर आज लसीकरण
विमानामुळे आमदारकीला मुकलेले सुबोध मोहिते राष्ट्रवादीत

आतापर्यंत लसीकरणासाठी शहरात १०६ केंद्र होते. यात शनिवारपासून दहाची भर पडणार असल्याचेही डॉ. चिलकर म्हणाले. त्यामुळे शनिवारपासून तरुणाईलाही लस घेता येणार आहे. लसीकरण केंद्र सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल.

४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोवॅक्सिन पहिला व दुसरा डोज मेडिकल, सिद्धार्थनगरातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, आशीनगर झोनमागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोज घेतलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मेडिकल व महाल रोग निदान केंद्र दुसरा डोज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

शहराला मिळाले २० हजार डोज; ११६ केंद्रांवर आज लसीकरण
आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत

जिल्ह्याला मिळाल्या ३९ हजार डोज

नागपूर जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून ३९ हजार लसी मिळाल्या आहेत. यापैकी २० हजार नागपूर शहरासाठी असून उर्वरित ग्रामीण भागासाठी आहे. त्यामुळे शहरासोबतच ग्रामीण भागातही लसीकरणाला वेग येणार आहे.

(The-city-of-Nagpur-received-20,000-doses)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.