नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा (coronavirus) विळखा आता बऱ्यापैकी सैल झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर (Healing rate at 96 percent) आले आहे. गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १५१ जणांनी कोरोनावर मात केली. तर नव्याने ४७६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात शहरातील २६४ जणांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात १६ जण दगावले आहेत. सद्या २ हजार २९६ जण रुग्णालयात आहेत. तर ६ हजार ३०० जण गृहविलगीकरणात आहेत. (the corona virus cure rate is 96 percent in Nagpur)
मे महिन्यात पहिल्या तारखेपासून सातत्याने बाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात ४ लाख ७३ हजार १७२ कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. यातील मात करणाऱ्यांची संख्या ४ लाख ५५ हजार २४६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२१ टक्क्यांवर गेले आहे. आतापर्यंत कोरोना झाल्यानंतर १ लाख १० हजार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजही १६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील ८, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी ४ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८ हजार ८५४ झाली आहे. यातील १ हजार ३५६ मृत नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. आज दिवसभरात शहरात १० हजार ८८३ व ग्रामीणमध्ये २ हजार १०८ अशा जिल्ह्यात १२ हजार ९९१ चाचण्या झाल्या आहेत. आता रुग्णसंख्या ओसरत असल्याने शहरातील शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालये व कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनसह आयसीयू व व्हेंटिलेटर असलेले जवळपास ५ जार ८७८ वर खाटा रिकाम्या आहेत.
केवळ २ हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णालयात
कोरोनाचा कहर ओसरला. जिल्ह्यात गंभीर संवर्गातील रुग्णांचीही संख्या घटत आहे. त्यामुळे बहुतांशी बाधित येणारे हे लक्षणे नसल्याने गृह विलगीकरणातच आहेत. सद्या ५२०२ व ग्रामीणमध्ये ३८७० असे ९ हजार ७२ सक्रिय रुग्ण आहे. यापैकी केवळ २ हजार २९६ जणांनाच सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असल्याने ते मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच सीसीसीमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. तर लक्षणे नसलेले तब्बल ६ हजार ३०० जण गृह विलगीकरणात आहेत.
(the corona virus cure rate is 96 percent in Nagpur)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.