नागपूर : कार्यकर्त्यांच्या गर्दीने गजबजलेला जिल्हा परिषद इमारत परिसरात आज, बुधवारी शुकशुकाट दिसून आला. त्यांच्या लगबगीला ब्रेक लागल्याचे दिसून आले. कर्मचारी मात्र हातात फाइल घेऊन येरझाऱ्या मारताना दिसून आले. सोमवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याचा परिणाम यावेळी दिसून आला.