नागपूर : प्रेयसीने घरी येण्यास नकार देताच प्रियकराने चाकूने गळा चिरून (The knife slit his throat) ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस (attempt to killed) आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिया (वय २०, काल्पनिक नाव) असे जखमीचे तर निखिल प्रताप दमके (वय २१) असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. (The-lover's-slit-throat-as-soon-as-he-refuses-in-Nagpur)
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल हा गॅरेजमध्ये काम करीत होता. लॉकडाउनमुळे त्याचे काम सुटले. त्यामुळे तो पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे काम करीत होता. त्याला दारूचेही व्यसन होते. त्याची प्रेयसी रिया ही हॉस्पिटलमध्ये काम करते. वस्तीत असल्यामुळे दोघांचे सूत जुळले. दोघांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या. निखिलने तिला जाळ्यात ओढून लग्न करण्याची मागणी घातली. तिनेही होकार दिला. तिने कुटुंबीयांकडे लग्नासाठी मागणी घालण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे निखिलने तिला पळवून नेले.
तिच्याशी एका मंदिरात लग्न केल्याचे बोलले जाते. त्यानंतर दोघे रामेश्वरी भागात राहायला गेले. परंतु, घरातील आर्थिक चणचणीमुळे दोघांमध्ये वाद व्हायला लागले. त्यातच निखिलचे लॉकडाउनमुळे काम सुटल्याने तणावात दारू प्यायला लागला. रियाशी वाद घातल्यानंतर मारझोड सुरू केली. त्यामुळे कंटाळून ती माहेरी उंटखाना येथे राहायला आली. निखिल हा आईलासुद्धा त्रास देऊ शकतो म्हणून ती भाड्याने खोली घेऊन राहत होती.
निखिल तिथेही तिच्यासोबत वाद घालायचा आणि मारहाण करायचा. रियाने इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रारही दिली. पोलिसांत तक्रार दिल्याने निखिल हा संतापला होता. मंगळवारी दुपारी निखिल हा रियाच्या घरी आला. त्याने तिच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला गेला. निखिल याने चाकूने रियाचा गळा चिरला. तिने आरडाओरड केली त्यामुळे निखिल पसार झाला. जखमी अवस्थेत रियाने मैत्रिणीशी मोबाईलवर संपर्क साधला आणि घरी बोलाविले. मोपेडवर ती मैत्रिणीसोबत मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून निखिलचा शोध सुरू केला आहे.
परिसरात एकच खळबळ
गेल्या आठवड्यापूर्वीच मेहुणी, पत्नी व सासू व मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घडली आहे. कौटुंबिक वादाचे पर्यावसान हे हत्याकांडात व्हायला लागले आहे. त्यातच प्रेयसीच्या घरात घुसून प्रियकराने ठार मारण्याच्या उद्देशाने गळा चिरला. त्यावेळी ती एकटीच घरी होती. जर शेजारी राहणारी तिची आई घरी असती तर आणखी मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा आहे.
(The-lover's-slit-throat-as-soon-as-he-refuses-in-Nagpur)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.