Oberoi Excellence Center : विद्यापीठातील ‘ओबेरॉय एक्सलन्स सेंटर’ होणार बंद

व्यवस्थापन परिषदेत निर्णय ः सेंटरद्वारेच बंद करण्याचा प्रस्ताव
Oberoi Excellence Center
Oberoi Excellence Centeresakal
Updated on

नागपूर ः बहुचर्चित ‘ओबेरॉय सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन रोबोटिक्‍स’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बुधवारी घेण्यात आलेल्या तातडीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Oberoi Excellence Center
Nashik News : रस्त्यावर डांबरी उंचवटे अन्‌ उपाययोजनांकडे पाठ; शहरातील गतिरोधक वादात

विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या कार्यकाळात २०१५ ला अमेरिकेच्या ‘एबीबी’ या कंपनीने विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला होता. त्यानुसार या सेंटर आणि त्यातील अभ्यासक्रमाला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने विद्यापीठात रोबोटिक्‍स सेंटर व्हावे यासाठी नागपूरसह, मुंबईत अमेरिकेच्या एबीबी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी सेंटरला आर्थिक मदत देण्यासाठी अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी संमती दिली होती. शिवाय विद्यापीठाने सेंटरमध्ये एका वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला होता. त्यानुसार कंपनीचे अधिकारी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी विद्यापीठातील बिल्डींगची पाहणी करीत.

Oberoi Excellence Center
Nashik News : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश

विद्यापीठात सेंटर उभारणीवर भर दिला आहे. तसेच विद्यापीठासोबत एक सामंजस्य करारही केला. कंपनीद्वारे तज्ज्ञ प्राध्यापक आणि अभ्यासक्रम तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली होती. शिवाय सेंटरमध्ये लागणारे सर्व तंत्रज्ञान कंपनीद्वारे देण्यात येणार होते. विद्यापीठाला केवळ सोयी-सुविधा द्याव्या लागणार होत्या. त्यानुसार २०१७ साली ओबेरॉय एक्सलन्स सेंटर सुरू झाले. त्यात रोबोटिक्स या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, त्यानंतर सेंटरला घरघर लागल्याने ‘आय नर्चर एज्युकेशन सोल्युशन कंपनी’कडून २१ नोव्हेंबर २०२३ ला सेंटर बंद करण्याचे पत्र देण्यात आले. त्यातून करार संपुष्टात येत सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oberoi Excellence Center
Jalgaon News: सांडपाणी प्रकल्पातील कोट्यवधींची मशिनरी पडून! वॉरंटी संपली; महापालिकेचे डिझेलवरील 80 लाख रुपये पाण्यात

कोट्यवधीचा खर्च

शहरात रोबोटिक्स विषयावर एकमेव केंद्र म्हणून विद्यापीठातील ‘ओबेरॉय सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन रोबोटिक्‍स’कडे बघितले जात होते. त्यासाठी विद्यापीठाने जमीन आणि मॉलिक्युलर बायोलॉजी विभागाच्या इमारतीमध्ये जागाही दिली होती. त्यात सेंटरकडून फर्निचर आणि इतर सुविधा देण्याचे ठरले होते. त्यानुसार प्रवेशित विद्यार्थ्यांचे शुल्कातून ९० टक्के सेंटरला तर १० टक्के देण्यात येत होते. २०२० पर्यंत हे केंद्र सुरू होते. त्यानंतर या केंद्राला उतरती कळा लागली.

६० लाखांचा रोबोट पडून

केंद्रात कंपनीच्या माध्यमातून ६० लाखाचा रोबोट खरेदी करण्यात आला होता. आजही केंद्रात तो रोबोट ठेवण्यात आला आहे. मात्र, आता सेंटर बंद झाल्यावर हा रोबोट कुणाचा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.