College Placement : राज्यातील प्लेसमेंटचा टक्का घसरला ;व्यावसायिक अभ्यासक्रमात २० हजारांची घट,विद्यार्थ्यांची वाढली चिंता

गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणामध्ये राज्यात नव्या संस्थांची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला असताना, प्लेसमेंटमध्ये मात्र, राज्याचा आकडा सातत्याने पिछाडत चालल्याचे दिसते.
College Placement
College Placementsakal
Updated on

नागपूर : गेल्या काही वर्षांत उच्च शिक्षणामध्ये राज्यात नव्या संस्थांची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक शिक्षणाकडे वाढला असताना, प्लेसमेंटमध्ये मात्र, राज्याचा आकडा सातत्याने पिछाडत चालल्याचे दिसते. विशेष म्हणजे, गेल्या २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ या वर्षीत राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्लेसमेंटमध्ये वीस हजाराची घट नोंदविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

राज्याच्या सीईटी सेलद्वारे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीचा निकालाची घोषणा नुकतीच झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा एक लाखांवर विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. त्यामुळे अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमांमध्ये रिक्त जागांची संख्या घटणार असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील अभियांत्रिकीसह, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन, एमसीए, फार्मसी आणि अप्लाईड आर्ट ॲण्ड क्राफ्ट या अभ्यासक्रमातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटचा प्रश्‍न कायम आहे.

गेल्यावर्षी राज्यात ३ लाख ५३ हजार १३४ जागांवर २ लाख ९२ हजार ७०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख २७ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, यापैकी १ लाख ५ हजार ५८४ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले. सुमारे २२ हजार ४७२ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, ही संख्या २०२१-२२ च्या तुलनेत ४ हजाराने कमी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, २०२३-२४ या वर्षांत या संख्येत भरीव वाढ झाल्याचे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.