नागपूर : कोरोनाचा (coronavirus) तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचा बचाव (Child protection) करण्यासाठी ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मुलांवरील मानवी चाचणी बुधवारी (Human testing on children Wednesday) नागपुरात सुरू होणार आहे. १२ ते १८ वयोगटांतील जवळपास ७५ मुलांवर ही चाचणी होणार आहे. यातील ४१ मुलांना कोव्हक्सिनचा डोस (41 children were given a dose of covacin) दिला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आता ६ ते १२ वयोगटातील ३५ मुलांची स्क्रिनिंग (Screening of 35 children) करण्यात आली आहे. या मुलांना उद्या लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. (The second phase of the clinical trial on children on Wednesday)
कोरोना विरोधातील लढ्यात लहान मुलांच्या बचावासाठी लसीकरण हा पर्याय आहे. यामुळे भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनची लहान मुलांवर क्लिनिकल ह्यूमन ट्रायल ६ जून रोजी नागपुरातून सुरू झाली आहे. १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना रविवारी डोस दिला आहे. मेडिट्रिना रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मार्गदर्शनात लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. या मुलांना २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. मात्र, पुढच्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील मुलांवरही ह्यूमन ट्रायल सुरू झाली असून ३५ मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. बुधवारी बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणात त्यांना लस देण्यात येणार आहे.
(The second phase of the clinical trial on children on Wednesday)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.