नागपुरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दंत परिवेष्ठनशास्त्र विभागात झालेल्या संशोधनातून कृत्रिम दातांचे प्रत्यारोपणासमयी ‘मिनिएचर स्रिंग’चा वापर सुरू झाला.
नागपूर: दात काढल्यानंतर कृत्रिमरीत्या खऱ्या दातासारखा दिसणारा दात बसवला (डेंटल इम्प्लान्ट) जाऊ लागला. यातूनच दंत चिकित्सा वरदान ठरत आहे. मात्र कृत्रिम दातांनी कडक वस्तू चावायला घेतली की, कृत्रिम दात निष्क्रिय होत असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेत नागपुरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दंत परिवेष्ठनशास्त्र विभागात झालेल्या संशोधनातून कृत्रिम दातांचे प्रत्यारोपणासमयी ‘मिनिएचर स्रिंग’चा वापर सुरू झाला. यामुळे कृत्रिम दातांमध्येही नैसर्गिक हालचाली दिसून आल्या. आता कडक पदार्थ चावल्यानंतरही कृत्रिम दात निष्क्रिय होत नाही.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील दंत परिवेष्ठनशास्त्र विभागातील डॉ. संकेत शिंदे तसेच या विभागाचे विभागप्रमुख डॉ. वैभव कारेमोरे यांनी हे संशोधन यशस्वी केले असून या संशोधनाचे पेटंटलासुद्धा मान्यता मिळाली आहे. विशेष असे की, या कृत्रिम दंत रोपणात संपूर्ण २८ दात लावता येतात.
अलीकडे वेगवेगळ्या पद्धतींनी कृत्रिम दात तयार करण्यात येतात. तोंडातील टाळूच्या पेशींचा आणि खालच्या जबड्यातील हाडाच्या आधारासाठी वापर करून कृत्रिम प्लेटमध्ये लावलेले काढत्या-घालत्या कवळीच्या पद्धतीचे दात (मुव्हेबल डेंचर्स) बनविण्याची कला विकसित झाली. दंत परिवेष्ठन शास्त्र विभागात हे संशोधन सुरू असताना प्रथम व्हिएनआयटीचे प्रा. अभिजित राऊत यांची मोलाची मदत झाली आहे. यांच्या समन्वयातून मुव्हेबल अर्थात हालचाली करणारे कृत्रिम दातांचे संशोधन करता आले.
पूर्वी व्हिएनआयटीमध्ये इंजिनिअरिंग ड्राईंग अर्थात डिझाईन काढले. या डिझाईनचे पेटंटसाठीचा प्रस्ताव सादर केला. तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. यात पुन्हा काही सुक्ष्म बदल करून नैसर्गिक दातांप्रमाणे कृत्रिम दातांच्या हालचाली होणे शक्य होणार आहे. मागील चाळीस वर्षांच्या काळात कृत्रिम दातांच्या अशा नैसर्गिक हालचाली होत नव्हत्या. शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक, विभागप्रमुख डॉ. वैभव कारेमारे, व्हिएनआयटीचे प्रा. अभिजित राऊत यांच्या समन्वयातून संशोधनापासून तर पेटंट मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया पुर्ण झाली.
दातांचे इम्प्लांट ही साधारण तीस-पस्तीस वर्षे प्रचलित आहेत. नैसर्गिकरीत्या चावणे हे कार्य उत्तम पार पाडताना कृत्रिम दंत प्रत्यारोपणातून मर्यादा येत होत्या. फिक्स दातांनी कडक वस्तू चावली की, निष्क्रिय होत होते. हालचाल होत नसे, मात्र ‘मिनिएचर स्रिंग’च्या वापरातून कृत्रिम दाताची हालचाल शक्य झाली. सगळे दात काढल्यानंतरही कृत्रिम दंत प्रत्यारोपणानंतर नैसर्गिक दातांसारख्या हालचालीतून सामान्यपणे दातांचे काम करता येते. कृत्रिम दातांच्या ज्या काही उणिवा, मर्यादा आहेत, ते सर्व दोष वगळून खऱ्या दातांसारखेच भक्कम असे हे कत्रिम दात असतील.
-डॉ. वैभव कारेमोरे, विभागप्रमुख, दंत परिवेष्ठनशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय. नागपूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.