नागपूर : गेल्या दोन निवडणुकीमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा प्रमुख पक्षांच्या जाहीरनाम्यातून गायब झाल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीतूनही मुद्द्याला बगल देण्यात आली असून साधे स्वतंत्र विदर्भ राज्याचे नावसुद्धा घेतले जात नाही. काँग्रेस आणि भाजपसारख्या पक्षांनी विदर्भ राज्याच्या मुद्यांवरून निवडणूक लढून ती जिंकली आहे. तर कधीकाळी विदर्भासाठी महाराष्ट्र बंदही ठेवण्यात आला होता.