लग्नासाठी दबाव आणल्याने गळा आवळून चोवीस वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जंगलात पुरल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. महेश वळसकर (५७) रा. न्यू सोमवारीपेठ असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याने खुनाची कबुली दिली असून बुधवारी मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.