जलतरण पटूंच्या आशा पल्लवित; मात्र, स्विमिंगमुळे विषाणूचा प्रसार होऊन इन्फेक्शन पसरण्याची अधिक भीती

There will be crowds at the swimming pools
There will be crowds at the swimming pools
Updated on

नागपूर : गृह मंत्रालयाने देशभरातील जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे उपराजधानीतील खेळाडूंच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारसोबतच मनपा प्रशासनानेही हिरवी झेंडी दिल्यास तब्बल सहा महिन्यानंतर तलावांवर गर्दी होणार आहे. तशी अपेक्षा खेळाडू, प्रशिक्षकांसह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

कोरोनाच्या उद्रेकानंतर लॉकडाउन लागल्याने मार्च महिन्यापासून शहरातील सर्व जलतरण तलाव सूनसान आहेत. त्यामुळे स्पर्धांसोबतच सरावालाही ब्रेक लागला आहे. मात्र, गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वामुळे (गाईडलाइन्स) १५ ऑक्टोबरपासून जलतरण तलाव सुरू करण्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे आता नागपुरातील जलतरण तलावही सरावासाठी खुले होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, त्यासाठी राज्य सरकारच आणि महापालिकेच्याही परवानगीची आवश्यकता आहे. जलतरण तलाव सुरू करण्यासंदर्भात लवकरच नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे पदाधिकारी आयुक्तांची भेट घेणार आहेत.

‘सकाळ’शी बोलताना संघटनेचे सचिव डॉ. संभाजी भोसले म्हणाले, शहरातील जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी साऱ्यांचीच इच्छा आहे. यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारकडून गाईडलाइन्सच्या प्रतीक्षेत आहोत. त्यांच्याकडून हिरव्या झेंडी मिळाल्यानंतर आमचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व आयुक्तांची भेट घेणार आहे.

किमान राष्ट्रीय जलतरणपटूंना तरी सरावाची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांना आम्ही करणार आहे. सद्यःस्थितीत विविध प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तीनशेच्या जवळपास नोंदणीकृत जलतरणपटू आहेत. सर्वच जण सध्या सरावापासून वंचित आहेत.

काहींचे ‘हा’ काहींचे ‘ना’

राष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा तळेगावकरनेही जलतरण तलाव खुले करून व्यावसायिक खेळाडूंना सरावास परवानगी मिळावी, असे मत व्यक्त केले. परवानगी मिळाल्यास जलतरण तलावाचे संचालक, खेळाडू व प्रशिक्षकही आवश्यक ती काळजी घेतील, असेही ती म्हणाली. यासंदर्भात दुसरा मतप्रवाहही दिसून येत आहे. काही प्रशिक्षकांच्या मते, उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा परिस्थितीत प्रशासनाने घाईघाईने निर्णय घेऊ नये. स्विमिंगमुळे विषाणूचा प्रसार होऊन इन्फेक्शन पसरण्याची अधिक भीती आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.