सहा दशकांपासून त्यांची चिखलातूनच वाट

शेतीच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा
amravati
amravatiSakal
Updated on

मोझरी (जि. अमरावती ) : गेल्या सहा दशकांपासून शेतीच्या वहिवाटीसाठी असलेला एकमेव पांदण रस्ता अतिशय खराब झाला आहे. पावसाने हजेरी(The rain) लावल्याने या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. तरीही नाइलाजास्तव चिखलातून(mud) कशीबशी वाट काढत आपल्या शेतापर्यंत पोहोचत आहेत. ‘आम्हाला किमान शेतात जायला रस्ता तरी द्या हो’, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.

amravati
Omicron test kit आजपासून दुकानांत उपलब्ध, जाणून घ्या किंमत व माहिती

पांदण रस्त्यांचा विषय दिवसेंदिवस चांगलाच क्लिष्ट बनत चालला असून रस्त्यांअभावी कित्येक शेतकऱ्यांना आपली शेती पडीक ठेवावी लागते. परिणामी शेतकऱ्यांकडे शेती असूनही त्यांना अपेक्षित उत्पन्न घेता येत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी चांगल्या उपजाऊ शेतजमिनी गुरांचे कुरण झाल्याचे दिसून येत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. याला सर्वस्वी शासनच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, गुरुदेवनगर येथील शेतकऱ्यांनी उपसरपंच संदीप बारमासे यांच्या नेतृत्वात तहसीलदार वैभव फरतारे यांच्याकडे ही समस्या मांडली. यावेळी गजानन विरूळकर, दिनेश चव्हाण, वासुदेव चव्हाण, किसनराव भुरे, अतुल भुरे, गोपाळ देशमुख, बालू लांजेवार, सुनील पिटकर, अनिल पिटकर व अन्य शेतकरी उपस्थित होते.

amravati
बसपच्या ‘हत्ती’ची चाल मंदावली; सातत्याने उतरता आलेख

शासनाचे उदासीन धोरण

पिढ्यान् पिढ्या आम्ही याच चिखलातून वाट काढत शेतापर्यंत पोहोचत आहोत. या रस्त्यात नेहमीच सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर असतो. शासनाच्या उदासीन धोरणामुळे आमच्यावर ही वेळ आली असल्याचे दिलीप मते या शेतकऱ्याने सांगितले.

कुणालाही शेतकऱ्यांप्रति आपुलकी नाही

आमच्या चार पिढ्या हा जीवघेणा संघर्ष झेलत आहेत. शासनाला वारंवार निवेदने देऊन आम्ही थकलो. कारण, कुणालाही शेतकऱ्यांप्रति आपुलकी नसल्याने आज होणार, उद्या होणार या आशेवर वर्षांची शंभरी पार झाली. हा पांदण रस्ता झालाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया गुरुदेवनगरचे उपसरपंच संदीप बारमासे दिली.(the rain)

amravati
सांगा, याला रस्ता म्हणावा की चिखलाची वाट...या रस्त्याने कसा करावा प्रवास

शेती असूनही उपयोग नाही

सध्या वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे तूर व हरभरा या पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच रात्रीचा दिवस करावा लागतो. पांदण रस्ता सोडून वहिवाटीसाठी जी पाऊलवाट होती तीसुद्धा बंद करण्यात आली आहे. ज्या पांदण रस्त्याने दिवसा जाता येत नाही तेथैन रात्री वाट काढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय. तेव्हा शेती असूनही रस्त्याअभावी शेतात जाता येत नसल्याची खंत गजानन विरूळकर या शेतकऱ्याने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.