Video : शासनाचे सर्व आदेश पाळून उरकले विवाहकार्य

उमरेड :  सामाजिक अंतर राखून विवाह बंधनात अडकलेले वरवधू.
उमरेड : सामाजिक अंतर राखून विवाह बंधनात अडकलेले वरवधू.
Updated on

उमरेड (जि.नागपूर) :  सध्या अवघ्या विश्‍वात पाय रोवून बसलेल्या कोरोना विषाणूने सगळीकडे हाहाकार माजविला आहे. दिवसागणिक कोरोनाबधितांची संख्या शेकडोने वाढत असल्यामुळे केंद्रशासन व राज्यशासनाने 14 एप्रिलला संपणारे "लॉकडाउन' पुढे ढकलले. त्यामुळे अनेकांची प्रस्तावित मंगलकार्ये खोळंबली. उमरेड शहरातील एक विवाह सोशल डिस्टसिंगचे भान ठेवून अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.

अधिक वाचा :  तीच्या कामाला "लॉकडाउन' नाहीच !

वधूवराने मास्क, सॅनिटायझरचा केला वापर
येथील शारदा वाघरे यांनी त्यांच्या मुलीचे लग्न गर्दी न करता अगदी सध्या पद्धतीने लावून दिल्याची घटना (ता.15) रोज बुधवारी सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. वधू मुलगी भाग्यश्री शारदा पांडुरंग वाघरे (रा. परसोडी उमरेड) या बीए पदवीधर असून वडील नसल्याने आई रोजमजुरी करून कुटुंब सांभाळते. वर मुलगा गगन कृष्णाजी देशमुख हे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे पाटबंधारे विभागात वाहनचालक आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या नवेगाव येथील रहिवासी आहेत.

दोन्ही पक्षाचे झाले संगनमत
हे लग्न मार्च महिन्याच्या 27 तारखेला उमरेडच्या एक मंगल कार्यालयात ठरले होते. तशा लग्नपत्रिकाही नातेवाइकांकडे वाटण्यात आल्या होत्या. परंतु, अचानक आलेल्या कोरोना विषाणू या जागतिक आपत्तीमुळे अवघ्या विश्वाची चाके पूर्णतः थांबली. तेव्हा भारतातदेखील "लॉकडाउन' झाले आणि संचारबंदी लागू झाली. वाघरे व देशमुख कुटुंबीयांपुढे प्रश्‍न उभा राहीला. परंतु, दोन्ही कुटुंबीयांनी शासनाचे सर्व आदेश पाळून विवाहकार्य उरकण्याचा निश्‍चय केला. संपूर्ण देशात संचारबंदी व लॉकडाउन परिस्थिती असल्यामुळे दोन्ही पक्षाने संगनमत करून साध्या पद्धतीने सामाजिक अंतर तथा स्वच्छता राखत विवाह साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.