अलर्ट! पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका; पशुसंवर्धन विभागाची तातडीने हालचाली

The threat of bird flu due to party migration
The threat of bird flu due to party migration
Updated on

हिंगणा (जि. नागपूर) : महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशात पक्षांच्या माध्यमातून ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’ येण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पुणे आयुक्तालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. पशुसंवर्धन आयुक्तांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाइन बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

सद्यस्थितीत देशातील हिमाचल प्रदेश, राजस्थान व मध्यप्रदेशात पक्षांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा धोका दिसून आला आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून मध्यप्रदेश असल्याने या राज्यातून पक्षांच्या स्थलांतरणातून ‘बर्ड फ्लू’चा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. साधारणतः कावळा या पक्षाच्या प्रजातीमध्ये ‘बर्ड फ्लू’ आढळल्याचे बोलले जात आहे. मध्यप्रदेश सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

इतर राज्यातून येणाऱ्या कोंबड्यांची वाहतूक मध्यप्रदेशात बंद केली आहे. ‘बर्ड फ्लू’चा धोका टाळण्यासाठी सीमा सील करण्याचासुद्धा मध्य प्रदेश सरकारचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अद्याप राज्यात कुठेही ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झालेले पक्षी आढळून आलेले नाही. तरीही या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रसिंग यांनी ९ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यांतील पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. बैठकीत पक्ष्यांच्या स्थलांतरणातून महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने दक्ष राहावे. पोल्ट्री फार्म उद्योगांसाठीही उपाययोजना संदर्भात विविध निर्देश देण्यात आले आहेत.

हिवाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. याच स्थलांतरणातून इतर राज्यातून महाराष्ट्रात पक्षी आल्यास ‘बर्ड फ्लू’ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘अलर्ट’ रहावे, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

संसर्ग तपासण्यासाठी भोपाळमध्ये एकमेव प्रयोगशाळा

पक्ष्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत कावळा या पक्षांमध्ये हा आजार दिसून येत आहे. बर्ड फ्ल्यूने जर पक्षाचा मृत्यू झाल्याचा संशय निर्माण झाला तर मृत पक्षाचे नमुने तपासण्यासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील उच्च सुरक्षा पशुरोग संस्था एकमेव प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. या प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतरच पक्षाला ‘बर्ड फ्लू’ झाला का, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबतही आयुक्तांनी पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा
पशुसंवर्धन आयुक्तांच्या निर्देशांनुसार नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांत पशुसंवर्धन विभागाची रॅपीड ॲक्शन फोर्स तयार करण्यात आली आहे. यात पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पक्षांमध्ये ‘मरतूक’ आढळून आल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. मृत पक्षाचे नमुने गोळा करून तातडीने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. अद्याप ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग असलेला पक्षी आढळून आला नाही. तरीही पूर्वतयारी म्हणून पशुसंवर्धन विभाग सज्ज करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही या संदर्भात सर्व पंचायत समितींना सूचना दिल्या आहेत. पोल्ट्री फार्म उद्योगांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहे.
- युवराज केने,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.