नागपूर : विदर्भात थंडीचा (Winter) कडाका सुरूच असून, नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन (mercury dropped again) पारा ७.६ अंशांपर्यंत खाली घसरला. दरम्यान, कडाक्याच्या थंडीने शहरात एकाच दिवशी पाच बळी (five die of cold)घेतल्याने ही लाट आता नागपूरकरांसाठी जीवघेणी ठरत आहे.
हाडे गोठवणारी थंडी सहन न झाल्याने गणेशपेठ, कपिलनगर व सोनेगाव परिसरात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वामन अण्णाजी सावळे (रा. गणेशपेठ वस्ती) हे ६५ वर्षीय वृद्ध फूटपाथवर मृतावस्थेत आढळून आले. तर कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५३ वर्षीय ट्रकचालक अशोक ऊर्फ दादाराव सोनटक्के (रा. गंजीपेठ) हे कामठी रोडवर ट्रकमध्ये मृतावस्थेत आढळून आले. याशिवाय सोनेगाव परिसरात ५४ वर्षीय उदय भुते हेसुद्धा मृतावस्थेत आढळले. सोनेगाव येथे ५० वर्षीय अनोळखी महिलेचा तर सदर येथीही ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला.
थंडीच्या लाटेचा प्रभाव मंगळवारीही विदर्भात तीव्रतेने जाणवला.काल राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन पारा या मोसमातील नीचांकीवर आला. तर पूर्व विदर्भात येणाऱ्या गडचिरोली येथे सर्वात कमी म्हणजेच ७.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली.
याशिवाय अमरावती (७.७ अंश सेल्सिअस), वर्धा (८.२ अंश सेल्सिअस) आणि गोंदिया (८.४ अंश सेल्सिअस) सह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमानातही दिवसेंदिवस घसरण होत आहे. थंडीची तीव्र लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
नागपूरच्या तापमानात झालेला बदल (अंश सेल्सिअसमध्ये)
तारीख तापमान
शुक्रवार १२.४
शनिवार १२.६
रविवार १३.४
सोमवार ७.८
मंगळवार ७.६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.