Nagpur Crime : पोलिसांना डांबून बालसुधारगृहातून तिघीजणी पळाल्या; वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर धक्कादायक सत्य आलं समोर

Nagpur Crime News : वैशाली दुरुगकर आणि पुजा पुरी या महिला वाहतूक पोलिस वर्धमाननगर परिसरात कर्तव्यावर असताना, त्यांना एका विना क्रमांच्या मोपेडवरून तीन मुली जाताना आढळल्या होत्या
three girls who ran away from Chhattisgarh juvenile detention center arrested by traffic police marathi news
three girls who ran away from Chhattisgarh juvenile detention center arrested by traffic police marathi news
Updated on

नागपूर : छत्तीसगडच्या बालसुधारगृहातील पोलिसांना डांबून ठेवत तेथून पळ काढून नागपुरात आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना महिला वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या समयसुचकतेमुळे वर्धमाननगरातून अटक केली. ही घटना शनिवारी (ता.६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

वैशाली दुरुगकर आणि पुजा पुरी या महिला वाहतूक पोलिस वर्धमाननगर परिसरात कर्तव्यावर असताना, त्यांना एका विना क्रमांच्या मोपेडवरून तीन मुली जाताना आढळल्या. त्यांनी त्यांना थांबवून विचारणा केली. यावेळी वाहन परवाना, आरसी बुक आणि गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांनी ते नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी काही पैसे घेऊन गाडी सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यास नकार दिल्यावर एकीने त्यांना भंडाऱ्यातील रहिवासी असल्याचे सांगून आई-बाबांशी भांडण झाल्याने नागपुरात आल्याची बतावणी केली.

three girls who ran away from Chhattisgarh juvenile detention center arrested by traffic police marathi news
Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

आता घरी परत जायचे असल्याने तुम्ही गाडी स्वतःजवळ ठेवून आम्हाला सोडा अशी विनंतीही केली. मात्र, तिच्यावर विश्‍वास न ठेवता, तिघींनाही मोबाइलची मागणी केली. तिघींनीही त्यांच्याकडे मोबाइल नसल्याचे सांगताच, त्यांना महिला पोलिसांनी खडसावून विचारणा केली असता, त्यापैकी एकीने आपल्या जवळील मोबाइल काढून दिला. त्यावरून पहिला डायल कॉल लावताच, समोरून एका मुलाने फोन उचलून ‘तुम्ही अद्याप आल्या का नाही?’ अशी विचारणा केली.

त्याचेशी पोलिसांनी बोलून तिघींनाही लकडगंज वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले. तिथे विचारणा केल्यावर त्या छत्तीसगड येथील असल्याचे समजले. यावेळी त्यांचा रेकॉर्ड तपासला असता, १६ आणि १७ वर्षांच्या दोन मुलींवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यात एकीने प्रियकराच्या मदतीने एका युवकाला तर दुसरीने भावाच्या मदतीने खून केल्याची बाब समोर आली. १४ वर्षीय मुलगी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी होती. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करीत, त्यांना छत्तीसगड पोलिसांना सूचना देत, त्यांच्या ताब्यात तिघांनीही देण्यात आले.

three girls who ran away from Chhattisgarh juvenile detention center arrested by traffic police marathi news
Mumbai Heavy Rains: विक्रमी पाऊस पडल्यामुळे मुंबईत पाणी साचलं, तरी निचरा वेगाने; CM एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

सुधारगृहातील पोलिसांना डांबून फरार

छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पलायन करताना, तिघींनीही बाथरूममध्ये रॉकेल टाकून आग लावली. त्यानंतर आरडाओरड करून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डांबून तेथून दुचाकीवरून नागपूर गाठले. दरम्यान तिघीनींही रात्री मद्यपान केले. नागपुरात आल्यावर त्या सकाळी इतरत्रही फिरल्या.

‘लाईफ सेटल करणा है मॅम’

छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पलायन करणाऱ्या तीन मुलींपैकी एकीचा प्रियकर हा भंडाऱ्यात असल्याची माहिती मिळाली. बालसुधारगृहातून पळून कुठेतरी त्याच्यासोबत लाईफ सेटल करायची आहे, अशी बतावणीही तिने केली. विशेष म्हणजे, त्यातील एकीने ती आर्किटेक्ट असल्याचीही बतावणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.