नागपूर : लंडनमध्ये राहणाऱ्या युवकासोबत नागपुरातील महिलेशी फेसबुकवरुन फ्रेंडशिप झाल्यानंतर त्याने महागडे गिफ्ट पाठविले. तिला लगेच दिल्लीच्या कस्टम विभागातून फोन आला. महिलेचा विश्वास बसला. महिलेने कस्टम ड्युटी म्हणून जवळपास तीन लाख रुपये फेसबुक फ्रेंडच्या खात्यात भरले. काही मिनिटाच त्याचा फोन स्विच ऑफ यायला लागला. अशाप्रकारे सायबर क्रिमिनलने महिलेला तीन लाखाने गंडा घालून फसवणूक केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीत कौर छटवाल या कडबी चौकात सेठी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना ३१ डिसेंबरला लंडनमध्ये राहणाऱ्या डॉ. केल्वीन मार्गन नावाच्या युवकाने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मनजीत यांची फेसबूकवरून डॉ. केल्वीनशी मैत्री झाली. दोघांची चॅटींग झाल्यानंतर डॉ. केल्वीनने मनजीत यांना महागडे गिफ्ट पाठविण्याचे प्रॉमिस केले. दोन दिवसांतच डॉ केल्वीनने फोन करून सांगितले की महागडे गिफ्ट भारतात पाठवले असून दिल्लीतील कस्टम विभागात पोहोचणार आहे. काही वेळातच दिल्लीती कस्टम विभागातील तोतया अधिकारी जयश्री यू नावाच्या युवतीचा फोन आला. लंडनवरून गिफ्ट आल्याचे सांगून कस्टम ड्युटीपोटी २ लाख ९५ हजार रुपये भरायचे असल्याचे सांगितले. मनजीत यांना महागड्या गिफ्टची उत्सुकता लागली. त्यांनी लगेच तीन लाख रुपये भरून गिफ्ट सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांना दिल्लीतील अधिकाऱ्यांनी कोणतेही गिफ्ट न आल्याची माहिती दिली. त्यांनी डॉ केल्वीनशी संपर्क साधला असता तो झाला नाही तसेच जयश्रीसुद्धा बनावट अधिकारी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी लंडनच्या डॉ. केल्वीन आणि जयश्रीवर गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.