एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तरुण मुलापाठोपाठ बापानेही सोडला जीव

file image
file imagecanva
Updated on

टेकाडी (जि. नागपूर) : धुळवळीच्या दिवशी वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने गावातील ३१ वर्षीय युवकाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला होता. त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. घरचा कर्ता मुलगा गेल्याचे दुःख मनात ठेवून ९५ वर्षीय वडिलांनी कुटुंबाला थरथरत्या हाताने धीर दिला होता. पंधरा दिवसात त्याच बापाला मुलाच्या विरहात गुरुवारला जगाचा निरोप घेण्याची वेळ आली. याच कुटुंबात दोन दिवसाआधी जवाहरलाल नेहरू रुग्णालयात चुलत सुनेचा मृत्यू झाला होता. लागोपाठ एकाच कुंटुंबात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना भीतीमुळे गहिवरल्या मनाने कुटुंबाने कमी संख्येत ९५ वर्षीय आजोबांच्या पार्थिवावर टेकाडी मोक्षधामात अंतविधी केला.

गावात सध्या मृत्यूने तांडव मांडले आहे. दोन दिवसांच्या आड होणाऱ्या मृत्यूने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील तरुण हरहुन्नरी युवक श्रीकांत शंकर कडू (वय३१) हा घरीतील कर्ता मुलगा श्रीकांत एनटिपीसी येथे नोकरीवर होता. सोबत वडिलांना मदत म्हणून ठेक्याने शेती देखील करायचा. ९५ वर्षाचा वृद्ध वडिलांना देखील श्रीकांतच्या कर्त्यापणामुळे हुरुप यायचा. २९ मार्चला धुलीवंदनाच्या दिवशी एकीकडे रंगोत्सव सुरू होता, तिथेच श्रीकांतची प्रकृती खालावल्याने तो मृत्यूशी झुंज देत होता. वेळीच ऑक्सिजन मिळाले नसल्याने रुग्णवाहिकेतच त्याने अखेरचा श्वास घेतला. घरचा कर्ता मुलगा गेल्याचे दुःख मनात ठेवून ९५ वर्षीय वडील आपल्या कुटुंबाला थरथरत्या हाताने धीर देत होते. मात्र, मुलाचे दुःख त्यांना विसरता आले नाही. ते गेल्या पंधरा दिवसापासून सतत विचारात मग्न राहत होते. अंतर्मनात दुःखाच डोंगर पेलणाऱ्या बापाने शेवटी मुलाच्या विरहात गुरुवारी (ता.१५) सकाळी जगाचा निरोप घेतला. शंकरराव शंभर वर्षे आयुष्य पूर्ण करणारच होते, पण मुलाच्या जाण्याचे दुःख ते सहन करू शकले नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. टेकाडी येथील मोक्षधामात कोरोनाचे नियम लक्षात घेता कमी लोकांमध्ये अंत्यविधी देण्यात आली. त्यांच्या जाण्याने मंदिरातील आरती मंडळाने त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.

हेही वाचा - यवतमाळमधील 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' सर्वेक्षणात आढळला 51 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग

गावात हळहळ -

जवाहरलाल नेहरू रुग्णालयात मंगळवारी (ता.१३) ऑक्सिजनअभावी मृत पावलेल्या पाच रुग्णांमध्ये शंकर कडू यांची चुलत सून कल्पना अनिल कडू वयाच्या ४० व्या वर्षी दगावली. शंकरराव यांनी स्वतःच्या डोळ्यादेखत मुलगा, सून व पुतण्याचा संसार पाहिला होता. गुरुवारी सकाळी शंकरराव गेल्याने एकाच कुटुंबातील पंधरा दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! बेड न मिळाल्यामुळे अर्ध्या वाटेतच शिक्षकाचा मृत्यू; नागपुरात सुविधांचा अभाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.