नागपुर : कोरोना मदतीसाठी पावणे तीन हजार अर्ज

कोरोना मदतीसाठी पावणे तीन हजार अर्ज
नागपुर : कोरोना मदतीसाठी पावणे तीन हजार अर्ज
नागपुर : कोरोना मदतीसाठी पावणे तीन हजार अर्जsakal
Updated on

नागपूर : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांचा मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आतापर्यंत पावणे तीन हजार अर्ज सरकारकडे आले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १० हजार १२२ मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

यासाठी राज्य शसनाने एक पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्ज करायचा आहे. आतापर्यंत २६६० अर्ज प्राप्त झालेत. यातील २१५० अर्ज हे शहर तर ५१० अर्ज हे ग्रामीण भागातील आहे. जिल्ह्यात १० हजार १२२ कोरोना मरुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यातील २६०४ मृत्यू ग्रामीण, ५८९३ शहरातील तर १६२५ मृत्यू हे जिल्ह्याबाहेरी व्यक्तींचे आहे.

नागपुर : कोरोना मदतीसाठी पावणे तीन हजार अर्ज
अकोला : मास्क, लस रोखेल कोरोनाचा नवीन संसर्ग!

येथे करा अर्ज

राज्य शासनाने अर्ज करण्यासाठी पोर्टल विकसित केले आहे. mahacovid19relief.in या साईटवर जाऊन आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहे. मदतीची रक्कम थेट अर्जजदाराच्या खात्यात वळता होईल. आपले सेवा केंद्राच्या माध्यमातून हा अर्ज करता येणार आहे. मोबाईल किंवा कॅम्प्युटरच्या माध्यमातूनही घरूनच अर्ज करता येणार असल्याचे प्रशासनाकडू सांगण्यात आले.

हे कागदपत्र आवश्यक

  • अर्जदाराचे आधार कार्ड

  • मृतकाचे आधार कार्ड

  • मृत्यू प्रमाणपत्र

  • अर्जदाराचे बॅंक खाते

  • रद्द (कॅंसल) केलेला चेक

  • कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र

  • किंवा आरटीपीसीआर किंवा सिटी स्कॅनचा रिपोर्ट

  • आयसीएमआरकडे नोंद असल्यास त्याची माहिती (असल्यास)

नागपुर : कोरोना मदतीसाठी पावणे तीन हजार अर्ज
अकोला : शास्त्रीनगरात ‘लुसी’ने शोधला गांजा

हे घेणार अर्जावर निर्णय

शहरी भागासाठी महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी तर ग्रामीण भागासाठी जिल्हा शल्य चिकित्स यांना प्राधिकत करण्यात आले आहे. हे अधिकारी अर्ज तपासून मंजुरीबाबत निर्णय घेतील.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाही स्वतंत्र सोय

राज्य शासनाने काढलेल्या आदेशात सेतू कार्यालयात अर्ज करण्याची सोय करण्यात येणार असल्याचे नमुद केले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याही प्रकारची सोय नाही. अर्ज करण्याबाबत संबंधितांकडून विचारणा होत असून त्यांना आपले सेवा केंद्राकडे बोट दाखविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.