पेंचमधील रिसाला क्षेत्रात आढळला वाघाचा मृतदेह, जवळ जाऊन बघताच सरकरली पायाखालची जमीन

tiger found dead in risala of pench tiger reserved nagpur
tiger found dead in risala of pench tiger reserved nagpur
Updated on

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात आज एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला असून त्याचे चारही पाय कापलेल्या स्थितीत आढळल्याने शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून वन विभागाच्या वन संवर्धन आणि संरक्षणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. दोन आठवड्यातील नागपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूची ही पाचवी घटना आहे. 

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या रिसाला वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७०७ मध्ये वनरक्षक शिंगरपुतळे हे गस्त करीत होते. दरम्यान, त्यांना वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या शरीरावरील संपूर्ण केस गळून पडले होते. मात्र, पायाचे चारही पंजे कापलेल्याचे उघडकीस आले. हा पूर्ण वाढलेला वाघ असून त्याचा मृत्यू सात ते आठ दिवसापूर्वीच झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या नियमानुसार बुधवारी (ता.२४) वाघाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यात येणार आहे. या घटनेचा तपास वनाधिकारी करीत आहे. राज्यात १३ वाघांचा मृत्यू गेल्या तीन महिन्यात झाले आहे. वाघाच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असताना आता नागपूर जिल्ह्यात वाघाची शिकार झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे वन विभागाला आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. २०१३ मध्ये बहेलिया शिकाऱ्यांना जेरबंद केल्यानंतर वाघांच्या शिकारी कमी झालेल्या होता. आता त्यातील काही शिकाऱ्यांना न्यायालयाने सोडल्याने शिकारी सक्रिय झाले का? असाही कयास लावला जात आहे. यानिमित्ताने वन विभागाच्या संवर्धन व संरक्षणावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. 

राज्यातील वाघांची संख्या - ३१२ 
विदर्भातील वाघांची संख्या - ३०५ 

जानेवारी ते मार्च - १३ वाघांचे मृत्यू 

  • अधिवास लढाईत - ७ 
  • पाण्यात पडून - १ 
  • शिकार - २ 
  • नैसर्गीक - ३ 

वाघांची शिकार का होते? -

  • शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वीज प्रवाह सोडल्याने वीजेचा धक्का लागून 
  • गावातील पाळीव प्राण्यांची शिकार थांबविण्यासाठी विष प्रयोग 
  • शिकार झालेल्या जनावरावर विष टाकणे 
  • अवयवाच्या तस्करीसाठी 
     

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()