लसीकरणातून डेल्टा प्लसवर मात; कोविशील्ड, कोव्हॅक्सीन प्रभावी

लसीकरणातून डेल्टा प्लसवर मात; कोविशील्ड, कोव्हॅक्सीन प्रभावी
Updated on

नागपूर : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने नागपुरात हलकल्लोळ उडवून दिला आहे. ९ हजारांवर बळी गेले. आता कोरोनाचे रूप बदलले. डेल्टा प्लसच्या (Delta Plus) रुग्ण वाढत असल्याने धोक्याचे संकेत देण्यात आले. पुन्हा निर्बंध लावण्यात लावले. मात्र, डेल्टा प्लस वेरियंटला घाबरण्याचे कारण नाही, याला रोखण्यात लसीकरणाचा डोस प्रभावी (Vaccination dose effective) ठरणार आहे. कोरोनाचा (Corona) संसर्गावर नियंत्रणासाठी मास्क घालण्यापासून अंतर राखण्याचे नियम पाळावे. ही खबरदारी घेतल्यास डेल्टा प्लसवर विजय मिळवणे सोपे जाईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. (To-overcome-Delta-Plus-vaccination-is-required)

डेल्टा प्लस वेरियंट धोकादायक आहे किंवा नाही, त्याचा लहान मुलांवरदेखील परिणाम किती होणार आहे, याबाबत अद्यापही शास्त्रज्ञांकडून संशोधन पुढे आले नाही. डेल्टा प्लस घातक वेरियंट नसल्याचा अहवाल सीएसआयआरच्या काही शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला पाठवला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी डेल्टा प्लसला घाबरून जाऊ नये. डेल्टा प्लस वेरियंट आढळला तरी त्याला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य रितीने हाताळून करता येईल असाही दावा तज्ज्ञांकडून केला आहे.

लसीकरणातून डेल्टा प्लसवर मात; कोविशील्ड, कोव्हॅक्सीन प्रभावी
पुरणपोळीचा पाहुणचार भोवला; एकाच घरातील सहा जणांना विषबाधा

कोरोनाची दुसरी लाट किती भयानक होती हे आपण अनुभवले. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या संक्रमणाचा प्रकार ‘बी.१.६१७.२’ होता. या लाटेने नागपूर जिल्ह्यात १० हजारांवर बळी घेतले. यानंतरही लसीकरणासाठी लोक स्वत:हून पुढे येत नाही. पुढे या विषाणूने रूप बदलले. आता बदललेला विषाणूने ‘ए व्हाय.१’ या डेल्टा प्लस’मध्ये बदलला आहे.

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची व्हावी तपासणी

कोरोनीची दुसरी लाट सर्वसामान्यांच्या घरात शिरली. दुसरी कोरोनाची लाट थोपवणे आवाक्याबाहेर गेले होते. त्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा तसेच शहर सीमा काही दिवसांसाठी बंद करण्याची गरज होती. मात्र, त्यावेळी ही उपाययोजना केली नाही. डेल्टा प्लस जर धोकादायकरीत्या परतला तर वाढत्या डेल्टाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातून नागरिकांना थेट प्रवेश बंदी करावी. सीमेवर तपासणी करून डेल्टाची लक्षणे दिसल्यास विलगीकरणात पाठवावे. सीमा बंदीतून डेल्टाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविणे शक्‍य आहे, असा सूर तज्ज्ञांशी केलेल्या संवादातून पुढे आला.

डेल्टा प्लसपासून दूर राहण्यासाठी

  • जिल्ह्यात सुमारे ६० टक्के नागरिकांचे लसीकरण आवश्यक

  • प्रत्येकाने स्वतःसह कुटुंबाच्या संरक्षणासाठी एन. ९५ मास्क वापरावा

  • शारीरिक अंतर राखण्यासोबत स्वच्छता बाळगण्याची गरज

  • वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे आवश्यक

  • महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे

  • जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांना क्वारंटाईन करा

  • मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र कक्षात दाखल करा

  • महापालिकेने सर्वेक्षण मोहीम राबवून जनजागरण करा

लसीकरणातून डेल्टा प्लसवर मात; कोविशील्ड, कोव्हॅक्सीन प्रभावी
baby adoption: मुलं दत्तक घ्यायचे आहे? वाचा संपूर्ण प्रक्रिया
तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी किंवा डेल्‍टा प्लस व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी उपलब्ध कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन प्रभावी आहेत, असे गृहीत धरून लसीचा डोस घ्यावा. लसीकरणाची मात्रा लहानापासून तर तरुण, वृद्धांसाठी वरदान आहे. डेल्टाचा प्रादुर्भाव झाला तरी गंभीर परिणाम होणार नाही.
- वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, मेडिकल

(To-overcome-Delta Plus-vaccination-is-required)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()