Vegetables Rate: टोमॅटोचे दर भिडले गगणाला, गृहिणींचे बजेट बिघडले

पावसाच्या हजेरीमुळे अद्यापही हवी तशी भाजीची आवक बाजारात सुरू झालेली नाही. मात्र, आता पावसाने माघार घेतल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात असल्याने पुढील १५ दिवसांत भाजीच्या दरात घसरण अपेक्षित आहे.
today vegetable rate tomato 100 kg coriander 150 rs kg household budget affect
today vegetable rate tomato 100 kg coriander 150 rs kg household budget affectsakal
Updated on

नागपूर : पावसाच्या हजेरीमुळे अद्यापही हवी तशी भाजीची आवक बाजारात सुरू झालेली नाही. मात्र, आता पावसाने माघार घेतल्याचे हवामान खात्याकडून सांगितले जात असल्याने पुढील १५ दिवसांत भाजीच्या दरात घसरण अपेक्षित आहे. मागील तीन आठवड्यापासून ४०० रुपये किलो असलेल्या कोंथिबीरच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे.

किरकोळ बाजारात कोथिंबीर १५० रुपये किलो तर टोमॅटोचे दर वाढले आहे. टोमॅटो १०० रुपये प्रतिकिलोवर गेले आहे. पितृपंधरवाडा सुरू झाला असून घरोघरी आता पूर्वजांना नैवेद्य दाखविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. आवक घसरली असून

२५ टक्क्यांवर आली आहे. परिणामी सध्या भाव कडाडले आहेत. सध्या नाशिक, स्थानिक शेतकरी, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, रायपूर, छिंदवाडा येथून भाजीची आवक सुरू आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत भाजीचे भाव घसरले असल्याचे भाजी विक्रेते राम महाजन यांनी सांगितले. तर टोमॅटोच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. मात्र आगामी दिवसांत भाज्यांची आवक वाढणार असल्याने दरात सुध्दा घतरण अपेक्षित आहे.

ठोक बाजारातील दर (प्रतिकिलो, रुपयांत)

भाजी - दर

  • कोथिंबीर- ५०

  • पालक - ४०

  • टोमॅटो- १००

  • वांगे- २०

  • भरताचे वांगे -४०

  • फुलकोबी -४०

  • पानकोबी- २५

  • कोहळे- २०

  • शिमला मिरची- ५०

  • भेंडी -५०

  • ढेमसे -६०

  • चवळी शेंगा -३०

  • गवार -६०

  • काकडी- ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.