नागपूरकरांनो सावधान! जिल्ह्यात वाढतोय म्युकरमायकोसिस; आतापर्यंत ४६ मृत्यू

नागपूरकरांनो सावधान! जिल्ह्यात वाढतोय म्युकरमायकोसिस; आतापर्यंत ४६ मृत्यू
Updated on

नागपूर : कोरोना (Coronavirus) कहर ओसरत असताना नागपूर जिल्ह्यात आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) वाढत आहे. नागपूर जिल्ह्यातील ९३१ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसहित पूर्व विदर्भात १ हजार ५४ जण बुरशीच्या अर्थात म्युकर मायकोसिसच्या विळख्यात अडकले. तर ४८ जणांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक नागपुरात ४६ जण दगावले आहेत. (total 46 people are no more due to mucormycosis in Nagpur)

नागपूरकरांनो सावधान! जिल्ह्यात वाढतोय म्युकरमायकोसिस; आतापर्यंत ४६ मृत्यू
दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार?

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराचा विळखा बसत आहे. २२ मेपर्यंत नागपुरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ९३१ जण आढळून आले आहेत. यापैकी ६८२ जणांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील ३३९ रुग्ण ठणठणीत बरे झाले.

यात शहरातील ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली. शहरात ३१ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर आरोग्य विभागाच्या नोंदीत शहर आणि ग्रामीण भागेत सुमारे ४६ मृत्यूंची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार मेयो, मेडिकलसह शासकीय व खासगी रुग्णालयांत आजवर जवळपास ५७५ वर रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे सर्व रुग्ण नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यातून तसेच उपचारासाठी आले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूची माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. म्युकरमायकोसिसचे रुग्ण विविध राज्यातून उपचारार्थ नागपुरात येत आहेत. शासकीय दंत रुग्णालयात आतापर्यंत ५३ तर न्युरॉन हॉस्पिटलमध्ये ६० बुरशीच्या आजारावरील रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. अशी माहिती आहे.

७२९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत आजपर्यंत १ हजार ५४ जण म्युकरमायकोसिसच्या विळख्यात अडकले असून सध्या ७२९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात भंडारा जिल्ह्यात १, चंद्रपूर जिल्ह्यातील ३४, गडचिरोली जिल्ह्यात बुरशीचे रुग्ण नाहीत. गोंदिया जिल्ह्यातील ६, नागपूर जिल्ह्यातील ६८२, वर्धा जिल्ह्यातील ३९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यशस्वी उपचाराने आजपर्यंत ३४७ रुग्णांना सुट्टी दिली गेली. त्यात चंद्रपूरच्या ४, गोंदियातील १, नागपूरच्या ३३९, वर्धा जिल्ह्यातील ३ व्यक्तींचा समावेश आहे.

नागपूरकरांनो सावधान! जिल्ह्यात वाढतोय म्युकरमायकोसिस; आतापर्यंत ४६ मृत्यू
मृत कोरोना रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला
म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही. मधुमेह, कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झाला, अशांना म्युकरमायकोसिसचा त्रास होत आहे. दात, नाकातील सायनस आणि डोळ्यांमध्ये तसेच मेंदूमध्ये हा विकार आढळून येतो. रुग्णालयातून सुटी झाल्यावरही आहाराचे काही नियम पाळणे आवश्यक आहे. पावसाळ्यात शेतात काम करताना शेतकऱ्यांनी मास्क, हातमोजे घालणे गरजेचे आहे.
-डॉ. प्रशांत निखाडे, अध्यक्ष, कान नाक घसा संघटना,विदर्भ विभाग.

(total 46 people are no more due to mucormycosis in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()