कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात पर्यटकांच्या रांगा लागला होत्या.
नागपूर - कोरोना नियंत्रणात आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात (Gorewada International Zoo) पर्यटकांच्या (Tourist) रांगा लागला होत्या. अकरा महिन्यातील १५१ दिवसात एक कोटी १७ लाख रुपयाचा महसूल (Revenue) गोळा केला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्याच्या २६ तारखेला विक्रमी १४०१ पर्यटकांनी भेट दिली. शेकडो पर्यटकांना बुकिंग न मिळाल्याने आल्या पावली परतावे लागले. वर्षाच्याअखेरीस दोन कोटीच्याजवळपास महसूल गोळा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन केले होते. शहरातील नवे पर्यटन डेस्टिनेशन म्हणून या स्थळाकडे विदर्भातीलच नव्हे तर मध्य भारतातील पर्यटकांची रीघ वाढली. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत दोन हजार पर्यटकांनी भेट दिली होती. फेब्रुवारी महिन्यात दहा हजार पर्यटकांनी भेट देऊन वाघ, अस्वल आणि बिबट्याचे दर्शन घेतले.
मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने उद्यान बंद होते. सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा उद्यान सुरु झाले. त्यानंतर पर्यटकांचा ओघ वाढला. दिवाळीत पर्यटकांचा रांगा लागल्या होत्या. दरम्यान, एकाच दिवशी १२०० ते १३५० पर्यटकांनी भेट दिली होती. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरच्या रविवारी मात्र, पर्यटकांनी नवा विक्रम केला. एकाच दिवशी १४०१ पर्यटकांनी भेट दिली आणि वाघ, बिबट आणि अस्वलांच्या दर्शनाचा आनंद लुटला. येथील टॉकिंग ट्रीही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
एकाच दिवशी १४०१ पर्यटकांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाचा वाढता प्रकोपामुळे आता पुन्हा चिंता वाढलेली आहे. नियमांचे पालन करू पर्यटनावर भर दिला जात आहे.
- प्रमोद पंचभाई, विभागीय अधिकारी, गोरेवाडा प्राणी संग्रहालय
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.