ट्रॅक्टर चालकाचा झाला अपघाती मृत्यू आणि केली अकस्मात मृत्यूची नोंद? पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह

tractor driver died in accident and police records sudden death
tractor driver died in accident and police records sudden death
Updated on

टेकाडी (जि. नागपूर) : तालुक्यातील बखारी,वाघोडा इत्यादी वाळू घाटांवरून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे,वाघोली शिवारात मंगळवार ता.१ च्या रात्री अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन २६ वर्षीय ट्रॅक्टर चालक प्रदीप उर्फ झामा रोशन नितनवरे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे.

प्रकरणी जखमी युवकाला त्याच्या मालकानी रुग्णालयात न नेता थेट त्याच्या आजोबांच्या घरी पोहचते केले ज्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे बिंग फुटले होते. कन्हान पोलिसांनी पहाटे मृतदेह ताब्यात घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आहे.सोबत बखारी शिवारातून एक अपघात ग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेन्यात आले असल्याने युवकाचा मृत्यू अकस्मात नसून अपघाती असल्याचे तर्क लावले जात असल्याने अवैध वाळू तस्करी संदर्भात पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्हे निर्माण झालेली आहेत.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू आणि कोळश्यांच्या धंद्यांचे मोठ्या रकमेच्या मोबदल्यात वाटप झाले आहे.वाढत्या अवैध वाहतुकीमुळे शहरातील रात्र ही वैऱ्यांची झालेली आहे.अश्याच एका रात्री अवैध व्यवसायात लिप्त आरोपि कडून चिरीमिरीच्या प्रकरणात पोलीस शिपाह्यला भर चौकात चाकूने भोसकून ठार करण्याचा प्रयत्न केलेला होता. तरीही पोलीस स्टेशन हद्दीत राजरोष पणे अवैध वाळू तस्करीला उत आलेला आहे. 

कन्हान नदी घाटांमधून रात्र भर वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू गावोगावी पोहचती केली जाते.मंगळवार ता. १ च्या रात्री मृतक ट्रॅक्टर चालक प्रदीप उर्फ झामा रोशन नितनवरे (२६ ) राहणार बोरडा (गणेशी) हा रात्री उशिरा अवैध वाळूचे भरलेले ट्रॅक्टर रिकामे करून पुन्हा ट्रॅक्टर भरण्यासाठी वाळू घाटावर सुसाट निघाला होता दरम्यान वाघोली शिवारात त्याचा ट्रॅक्टर वरून तोल सुटला आणि त्याचा अपघात झाला,ट्रॅक्टर मालकासोबत त्याच्या सहपाट्यांनी रात्री १:३० वाजता सुमारास रुग्णालयात न नेता त्याच्या घरी पोहचते करून ट्रॅक्टर वरून पडला असल्याची माहिती देऊन पळ काढला.

 प्रदीपला घरी आणल्यानंतर तो कुठल्याही प्रकारची हालचाल करत नसल्याने त्याच्या घरच्यांनी शेजाऱ्याना हाक दिली. तेव्हा तो मृत असल्याचे निष्पन्न केले याची माहिती तात्काळ गावातील पोलिस पाटलांनी कन्हान पोलिसांना माहिती दिली.कन्हान पोलीस पहाटे बोरडा येथे पोहचून मृतदेह कामठी येथे शवविच्छेदनासाठी नेऊन प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र प्रकरण अकस्मात नसून अपघाती असल्याचे दिसून येत आहे.

गुरुवार सकाळी वाघोली शिवारातून अवैध वाळू तस्करीत सामील अपघात ग्रस्त ट्रॅक्टर कन्हान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर ट्रॅक्टरवरच मृत प्रदीप उर्फ झामा रोशन नितनवरे हा चालक म्हणून कार्यरत असल्याची चर्चा रंगलेली असल्याने प्रकरणी प्रदीप चा मृत्यू अकस्मात कसा? हा प्रश्न उभा केला जात आहे.सोबत अवैध वाळू वाहतुकीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असून अखेर अवैध वाळू माफियांना कुणाचे अभय असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी योग्य कारवाही करून प्रकरणी न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.