रुग्णांना दिलासा! अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे; उद्यापासून होणार रुजू

रुग्णांना दिलासा! अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे; उद्यापासून होणार रुजू
Updated on

नागपूर : मानधनात वाढ, विमा कवच आणि इतर मागण्यांसाठी नागपूरच्या मेडिकल (Government Medical Hospital), मेयोतील (Mayo Hospital) ३५० वर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे चार दिवसांपासून संपावर गेले होते. पण या डॉक्टरांनी संप मागे घेतला असून ते सोमवारपासून सेवेत रुजू होणार असल्याने रुग्णांनाही दिलासा मिळणार आहे. शनिवारी- रविवारी सुट्टी असल्याने हे डॉक्टर प्रत्यक्षात सोमवारपासून सेवेवर रुजू होणार आहेत. (Trainee doctors take back Protest in Nagpur)

रुग्णांना दिलासा! अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे; उद्यापासून होणार रुजू
'वाझे प्रकरणाची सर्व सूत्रे हलत होती परमबीर सिंग यांच्याच कार्यालयातून'; समोर आली धक्कादायक माहिती

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची गेल्या पाच दिवसांमध्ये नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त राधाकृष्णनन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह इतरही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या डॉक्टरांना तुमच्या विम्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र देत या डॉक्टरांनाही विमा सुरक्षा देण्याची विनंती केली.

प्रशासनाकडून मानधनाच्या विषयावर जास्त मानधन देणाऱ्या मुंबई, पुणे येथील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियमानुसार शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. या मागण्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगत संप परत घेण्याची घोषणा डॉ. शुभम नागरे यांनी केली.

रुग्णांना दिलासा! अखेर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मागे; उद्यापासून होणार रुजू
अखेर उपराजधानीच्या जीवात आला जीव! तब्बल १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आमच्या मानधन वाढीसह सेवेदरम्यान विमा कवच देण्याच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचे आश्वासन देत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत त्यांनी संवादही साधला. मेडिकल आणि मेयोत संप परत घेतल्याने डॉक्टर सेवेवर परतणार आहेत.

-डॉ. शुभम नागरे, प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रतिनिधी, मेडिकल नागपूर.

(Trainee doctors take back Protest in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()