Nagpur Police News : तर तृतीयपंथीयांची खैर नाही

पोलिस आयुक्तांचे खडेबोल; गुन्हेगारी कृत्यांचा तपशील तयार
transgenders forcefully extort money from citizens if there is complaint nagpur police action amitesh kumar
transgenders forcefully extort money from citizens if there is complaint nagpur police action amitesh kumaresakal
Updated on

नागपूर : नागरिकांवर दबाव आणून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांनी यापुढे काहीही केल्यास त्यांची खैर नसून तक्रार आल्यास त्यांना शहरातून हद्दपार करू अशी रोकठोक भूमिका पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली आहे.

नागपूरमध्ये तृतीयपंथीयांच्या उच्छाद चांगलाच वाढाला आहे. आता प्रत्येक चौकात टोळ्याच उभ्या असतात. वाहनचलाकांना पैशासाठी वेठीस धरले जाते. त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जबरीने पैसे मागितल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले.

त्यावरून तृतीयपंथीयांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत असा आदेश मागे घेण्याची विनंती केली. आम्हाला कोणीही काम देत नाही. अशात जमावबंदी आदेश लागू केल्याने आमच्यावर उपासमारीची वेळी आली आहे. आम्हाला पैसे मागू देण्यात यावे, अशी विनंती शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

यावेळी तृतीयपंथीयांनी यावरच आमचे पोट असून ते बंद केल्यास कसे जीवन जगणार असा भावनिक प्रश्‍न उपस्थित केला. मात्र, त्यावर आयुक्तांनी हे काम करण्यापेक्षा दुसऱ्या कामातून पैसे मिळवित उदरनिर्वाह करण्याचा सल्ला दिला. तसेच नागरिकांची इच्छा असल्यास ते आपल्याला पैसे देतील.

परंतु आपण त्यांच्या घरी जाऊन पैसे मागणे योग्य नाही. चौकातही वाहनचालकांकडून पैसे उकळण्यात येतात. तुमच्या उदरनिर्वाहासाठी काम मिळवून देण्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्वच प्रयत्न करू. खासगी नोकरी मिळवून देऊ,असे आश्वासनही पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.

मंगलकार्यालयात क्रमांकाची यादी

तृतीयपंथीयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी यापुढे मंगलकार्यालयात तृतीयपंथीयांच्या फोन क्रमांकाची यादी लावण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. मंगलकार्य असणाऱ्याने तुम्हाला फोन करून बोलावले तरच तुम्ही जा अन्यथा मंगल कार्यालयात जाऊ नका,असेही त्यांनी बजावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.