Accident News: खड्डा चुकवताना हिंगणघाटमध्ये महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटली; एकाचा मृत्यू, तर आठ प्रवासी जखमी

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान वर्ध्याच्या हिंगणघाट येथील नागपूर - हैदराबाद महामार्गावर खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स पलटल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात आठ जण यात जखमी झाले आहेत.

Accident News
Jayanta Patil : जातीनिहाय जनगणनेविषयी जयंत पाटलांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका ; म्हणाले..!

ही ट्रॅव्हल्स हैदराबाद येथून रायपूरला चालली होती. ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर ५० पेक्षा जास्त प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये असल्याची माहिती आहे. ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट जवळ पोहचली. छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डयांचा अंदाज चालकाला न आल्यामुळे खड्डा चुकवताना चालकाचे ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Accident News
Biodiversity Crisis : पश्चिम घाटातील जैवविविधता संकटात; गगनबावड्याच्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, काय आहे कारण?

तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमींना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले आहे. घटनास्थळी हिंगणघाट पोलीस पोहचले असून तपास सुरू आहे.

Accident News
Nanded Hospital Death: मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.