वृक्ष लागवड @ ४४.६ तापमानात; महापालिका दोन कोटींचा करणार पालापाचोळा

शहरातील वायू गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला २ कोटी १४ लक्ष रुपये दिले
Tree planting at temperature of 44 degree Municipal Corporation will spend 2 crore
Tree planting at temperature of 44 degree Municipal Corporation will spend 2 croresakal
Updated on

नागपूर : शहरातील वायू गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला २ कोटी १४ लक्ष रुपये दिले आहेत. यातून विद्यापीठाच्या १५ एकर जागेवर वृक्ष लागवड करण्यात येणार असून आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमानात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या तापमानात लावलेली झाडे जगणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेच्या दोन कोटींच्या खर्चाचा पालापाचोळा होण्याची शक्यता बळावली आहे.

महानगरपालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर वि‌द्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेवर आठ हजार रोपांची लागवड करून येथे वन आच्छादन करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीला शनिवारी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे यांनी कुदळ मारून वृक्ष लागवड केली. विशेष म्हणजे, आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

या तापमानात किंबहुना उन्हाळ्यामध्ये वृक्षलागवड केली जात आहे. या तापमानात वृक्ष लागवडीसाठी शहरातील भौगोलिक स्थिती अनुकूल नाही, ही बाब शहरातील कुणीही सांगू शकेल. परंतु, उच्चविद्याभूषित अधिकारीच यापासून अनभिज्ञ दिसून येत आहे. यावेळी आयुक्तांनी वृक्षलागवड व झाडांना पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

तीन वर्षे देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची

महापालिकेने वृक्षलागवडीचे कंत्राट उस्मानाबाद येथील तेजस सुपरस्ट्रक्चर प्रा. लिमिटेड कंपनीला दिले आहे. झाडांची तीन वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे. विद्यापीठाच्या १५ एकर जागेत विविध प्रजातींची ८ हजार झाडे लावण्यात येणार आहे.

एप्रिल, मेमध्ये जम्मू कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात अनुकूल वातावरणामुळे वृक्षलागवड केली जाते. परंतु आपल्याकडे ४५ अंश सेल्सिअस तापमानात लावलेली झाडे जगूच शकत नाही. या तापमानात झाडे लावणे निसर्गाच्या विरोधात आहे.

- सुभाष डोंगरे, सेवानिवृत्त वनाधिकारी व अध्यक्ष, अ. भा. वनाधिकारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.