Tribal students protest : ‘लाडक्या बहिणीं’चे लाड आम्ही मात्र उपाशी,आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप

Tribal students protest : नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या निधीच्या विलंबामुळे आदिवासी विकास विभागासमोर ठिय्या आंदोलन केले.
Tribal students protest nagpur
Tribal students protestsakal
Updated on

नागपूर : आदिवासी वसतिगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात थेट निधी (डीबीटी) देण्याचा निर्णय शासनाने सहा वर्षांपूर्वी घेतला.

मात्र नागपूर विभागातील विद्यार्थ्यांच्या खात्यात मागील तीन महिन्यांपासून पैसे जमा झाले नाही. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागासमोर ठिय्या आंदोलन केले.

बॅंक खात्यात मागील तीन महिन्यांपासून पैसे जमा झाले नाही, त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करा, त्यांना भेट द्या, परंतु आम्हाल उपाशी का ठेवता? असा सवाल आदिवासी विभागासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

विशेष असे की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये दर महिन्याला ४ हजार ३०० रुपये जमा होतात. पंरतु मागील ३ महिन्यांपासून पैसे जमा केलेले नाही. तसेच वर्षभरापूर्वी शासनाच्या चुकीने खात्यामध्ये अधिकचा निधी जमा केला होता. यामुळे प्रशासनाने सर्व मुलांचे बॅंक खाते गोठवले होते. अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे खाते गोठवलेच आहे. यामुळे त्यांचे इतर व्यवहार ठप्प पडले असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

अभ्यास सोडून जेवणासाठी बाहेर फिरावे लागते. मुख्य म्हणजे जेवणाचे मिळणारे पैसे येण्याची प्रतीक्षा किती दिवस करणार. यामुळे डीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे पैसे बंद करावे आणि खानावळ सुरू करावी. तसेच मुलांचे बंद केलेले बॅंक खाते सुरू करण्यात यावे.

- सूरज पेंदाम, अध्यक्ष, आदिवासी विद्यार्थी संघटना, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.