Nagpur strike affects ST Transport: ट्रक चालकांच्या आंदोलनाचा फटका स्थानिक नागरिकांसह भंडारा आणि अमरावती महामार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाला बसला. तसेच एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या आंदोलनामुळे पुढचा प्रवास करताच आला नाही.
भंडारा महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाहीपासून तर लाल बस पारडी, कापसी परिसरात अडकल्या. यामुळे पुढे न गेल्यामुळे एसटी वाहकांना प्रवाशांचे पैसे परत करावे लागले. सुमारे एक लाखावर प्रवाशांना आज नागपूर जिल्ह्यात फटका बसला.
पैसे परत घेतल्यानंतर पुढचा प्रवास तर थांबला, मात्र घरी परतताना ऑटोचालकांनी जादाचे पैसे उकळले. काही प्रवासी तर रस्त्यावरून पायीच जात होते सायंकाळपर्यंत भंडारा महामार्गावरून शहरात एकही प्रवासी दाखल झाला नाही. विशेष असे की, गणेशपेठ एसटी आगारात प्रचंड गर्दी झाली होती. (Latest Marathi News)
याआगारातील बस फेऱ्या रद्द
गणेशपेठ - २५४० किलोमिटरच्या १६ फेऱ्या रद्द
वर्धमाननगर - ९६० किलोमिटरच्या ८ फेऱ्या रद्द
उमरेड - १५५० किलोमिटरच्या१६ फेऱ्या रद्द
काटोल - ५७५ किलोमिटरच्या ४ फेऱ्या रद्द
घाटरोड - ३५८९ किलोमिटरच्या ४६ फेऱ्या रद्द
इमामवाडा - ७७६ किलोमिटरच्या ६ फेऱ्या रद्द
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.