तुली इंपेरियलवर छापा : अंगविक्षेपासह मद्यधुंद युवक-युवतींचा गोंधळ; मद्य व हुक्कापॉट आढळले

Tuli Imperial was raided by the police and a case was registered Nagpur police news
Tuli Imperial was raided by the police and a case was registered Nagpur police news
Updated on

नागपूर : मनाई आदेश झुगारून रामदासपेठेतील हॉटेल तुली इंपेरियलमध्ये रात्री उशिरापर्यंत ओली पार्टी सुरू होती. मद्यधुंद युवक-युवती, महिला-पुरुषांचा अंगविक्षेपासह गोंधळ सुरू होता. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून मद्यपींची झिंग उतरविली. या प्रकरणात हॉटेल मालक, सहायक व्यवस्थापकासह ६७ ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल व्यवसायी मोहब्बतसिंग तुली (रा. बोखारा), बचिदरसिंग ऊर्फ कुक्कू तुली आणि सहायक व्यवस्थापक संजय पेंडसे (३९, रा. प्रसादनगर, जयताळा) अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. येथे आढळलेल्या ग्राहकांमध्‍ये शहरातील चर्चित नावांचाही समावेश आहे.

थर्टीफस्ट निमित्त तुली इंपेरियलच्या दुसऱ्या माळ्यावरील गार्डन लॉनवर जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ३०० ते ४०० जण सहभागी झाले होते. रात्री ११ नंतर पार्टीला मनाई असल्याने अनेकांनी तिथून काढता पाय घेतला. ६० ते ७० जण तिथेच थांबून होते.

मनाई आदेश असतानाही हॉटेलचे कर्मचारी ग्राहकांना मद्य पुरवीत होते. सोबतच हुक्कापॉटही उपलब्ध करून देण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे ३.३० च्या सुमारास धडक दिली. त्यावेळी ६७ युवक-युवती दारूच्या बाटल्या, कॅन हातात घेऊन मोठमोठ्याने ओरडून गोंधळ घालताना दिसले. टेरेसवरच विदेशी ब्रॅण्डची दारू, हुक्का व अन्य साहित्य अस्ताव्यस्त पडून होते.

गोंधळासह हुक्का व दारूचे सेवन करतानाचे महिला-पुरुषांचे व्हिडिओ असलेले तांत्रिक पुरावेही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. हा प्रकार कोरोनाचा संसर्ग वाढण्यात कारणीभूत ठरणारा होता.

ग्राहकांनी व्यक्तिगत सुरक्षिततेसह जनतेच्या सुरक्षेलाही बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याने सीताबर्डी पोलिसांनी कोटपा महाराष्ट्र सुधारणा कायदा २०१८, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग अधिनियम१८९७, महाराष्ट्र पोलिस कायदा, दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.