Nagpur Crime : उपराजधानी हादरली! २४ तासांत दोन खून, दाम्पत्यावर हल्ला

अनैतिक संबंधाचा उल्लेख केल्याने मजुराला संपवले; नाचण्याच्या वादातून चाकूने वार
Murder
MurderSakal
Updated on

नागपूर - ‘क्राईम सिटी’ ठपका असलेल्या नागपुरात या महिन्यात सातत्याने होत असलेल्या खुनांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविली असताना २४ तासांत दोन खून झाल्याने शहर हादरले. जरिपटक्यात अनैतिक संबंधाचा उल्लेख केल्याने तर यशोधरानगरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आली. याशिवाय हुडकेश्‍वर परिसरात कार्यक्रमात नाचण्याच्या वादातून एकाने दाम्पत्यावर हल्ला केला.

जरिपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नारामधील वेलकम सोसायटी राहणाऱ्या महेशकुमार नकालसिंग उईके (वय २५, रा. नारा, मुळ रा. बिसनपूर, छिंदवाडा, मध्यप्रदेश) याचा दोघांनी अनैतिक संबंधातून खून केला.

ही घटना शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. करण उर्फ भारती उईके (वय २० रा.नारा, मुळ सिवनी, मध्यप्रदेश) आणि राजकुमारी उइके (वय ३५ रा.नारा, मुळ सिवनी, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही ठिय्यावरून मजुरी करतात. राजकुमारी आणि करण हे ‘लिव्ह इन’ मध्ये राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशकुमार याचे घरासमोर असलेल्या कमलेश विष्णू भलावी (वय ३५) याच्यासोबत महेशकुमार दारू पित बसले होते. यावेळी महेशकुमार याने कमलेश याचे राजकुमारी यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. महेशकुमार याने त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली.

याशिवाय राजकुमारी यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळ दोघांचेही भांडण सुरू झाले. त्यातून महेशने धक्का देत, मारहाण सुरू केली. यात राजकुमारी जखमी झाली. तेव्हाच तिथे करणही आला. त्यानेही महेशकुमार यांच्याशी वाद घातला.

दरम्यान राजकुमारी हिने त्याला दंडुक्याने डोक्यावर मारले आणि करणने लोखंडी रॉडने डोक्यावर वार करीत खून केला. याची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी दाखल होत, कमलेश यांच्या फिर्यादीवरुन दोघांनाही ताब्यात घेत, गुन्हा दाखल केला.

जुन्या वैमनस्यातून हत्या

यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वैमनस्यातून यशोधरानगर परिसरात एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता.२०) सांयकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.

बादल पडोळे (२५, रा. भवानी माता मंदिर, पारडी) असे मृताचे नाव आहे. चेतन सूर्यवंशी (वय २२, रा. गांजाखेत) असे आरोपीचे नाव आहे. दोघांचेही भाऊ एकमेकांचे चांगले मित्र असून आज ते दोघेही एकमेकांसोबत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन हा पूर्वी यशोधरानगर परिसरात राहत होता.

मात्र, त्याने काही महिन्यांपूर्वी यशोधरानगर सोडले आणि गांजाखेत येथे राहण्यास गेला. दरम्यान रविवारी सायंकाळी चेतन यशोधरानगरात आला. काही वेळाने बादलही यशोधरानगर परिसरात आला. दोघांनी एकमेकांना बघितले. यावेळी जुन्या वादातून बादल आणि चेतनमध्ये भांडण सुरू झाले. रागाच्या भरात चेतनने धारदार शस्त्राने बादलच्या पोटावर वार केले. बादल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व चेतन पसार झाला.

यशोधरानगर पोलिसांनी धाव घेत मृतदेह मेयोत नेला. त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावरून चेतनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी सांगितले.

दाम्पत्यावर चाकू हल्ला

हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खरसोली परिसरात राहणाऱ्या दाम्पत्यावर एकाने चाकुने वार करीत दोघांनाही गंभीर जखमी केले. यातील पतीची प्रकृती नाजूक असल्याचे कळते.

दिनेश पाटील (वय ४५ रा.खरसोली) असे आरोपीचे नाव असून सुखदेव उइके (वय ६० रा. खरसोली) आणि रेखा उइके (वय ५५) असे पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.१९) रविवारी रात्री रेखा आणि सुखदेव उइके हे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

कार्यक्रमात नाचण्यावरून दिनेश आणि सुखदेव यांच्यात भांडण झाले. नातेवाईकांच्या मध्यस्तीने भांडण मिटल्यावर जेवण केल्यावर दोघेही घरी निघाले. वाटेत दिनेश पाटील त्यांना भेटला. त्याने पुन्हा वाद घालून सुखदेव यांच्या पोटात चाकूने वार करीत जखमी केले आणि पत्नीवरही वार करून पसार झाला.

दरम्यान ते दोघेही घरी गेले. त्यांना अधिक त्रास झाल्याने रेखा यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना सूचना दिली. यावेळी पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांनी गुन्हा दाखल करीत, आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com