शितलवाडी: रामटेक तालुक्यातील महादुला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.७) ११ वाजताच्या सुमारास घडली..प्राप्त माहितीनुसार, रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथील वृषभ राजेंद्र गाडगे व रोहन सुभाष साऊसाखडे (वय १३, हे दोघेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय, महादुला) येथे आठवीमध्ये शिक्षण घेत होते. .शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. ११ वाजताच्या सुमारास दोघेही नदीत उतरले. दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला..Nagpur Gambling News : जुगार खेळणाऱ्या चौघांना अटक .त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही बुडाला. गावातील पोहणाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. घटनेची माहिती सरपंच शरद डडुरे यांना मिळताच त्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना कळविले. त्यांनी तत्काळ एसडीआरएफ पथक घटनास्थळी पाठवले. पथकाने दोन बोटींच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.