शीतपेयातून गुंगीचे औषध देत मामाने केले भाचीशी अश्‍लील चाळे

atyachar
atyachar
Updated on

नागपूर : मुलांना राखी बांधण्यासाठी घरी आलेल्या १७ वर्षांच्या सख्ख्या भाचीला बघून मामाची नजर फिरली. त्याने भाचीला शीतपेयातून गुंगीकारक औषध टाकून बेशुद्ध करून अश्‍लील चाळे करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मानकापूर पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून नराधम मामाला अटक केली आहे.

आरोपी मामा संजय (काल्पनिक नाव) हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हुडकेश्वर परिसरात त्याचे घर आहे. कामाचे ठिकाण लांब पडते म्हणून त्याने मानकापूर परिसरात खोली किरायाने घेतली. त्याच खोलीवरून तो कामावर जातो. मुलगी अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी असून संजयची भाची आहे.

रक्षाबंधनानिमित्त ती संजयच्या मुलांना राखी बांधायला गेली होती. राखी बांधल्यानंतर दुसऱ्या दिवशी संजय तिला तिच्या घरी सोडून देणार होता. संजय भाचीला घेऊन निघाला. दरम्यान, त्याच्यातील सैतान जागा झाला. तो भाचीला घेऊन खोलीवर गेला. संजयने दारू ढोसली. नशा चढल्यानंतर त्याने शीतपेयात भाचीला गुंगीकारक औषधी दिले.

atyachar
पॉर्नोग्राफी हे दुष्टचक्र; मात्र, जाळ्यात अडकतोय विद्यार्थी

ती बेशुद्ध झाल्याचे बघून संजयने अश्‍लील चाळे करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ती शुद्धीवर आली आणि मामाचे कृत्य पाहून घराबाहेर पळाली. तेथे शेजारी गोळा झाले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.