नागपूर : बेरोजगार तरुणांना नासामध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सव्वा पाच कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्यांनीच स्वतः तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली होती.
हे दोघेही कोंढाळी येथील दुहेरी खुनाचा मास्टरमाईन्ड ओंकार महेंद्र तलमले (वय २७ रा. दत्तवाडी) याचे साथीदार आहेत. अश्विन अरविंद वानखेडे (वय ३२, रा. जयदुर्गा सोसायटी, मनीषनगर) व चेतन कृष्णराव भोसले (वय ३० रा. दत्तात्रयनगर, सक्करदरा) अशी या दोन्ही साथीदारांची नावे आहेत.