नागपूर : नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नवीन नवीन प्रकल्प येथे येऊ घातले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपुरात मेट्रो आली. याला सुरुवातीला विरोधकांकडून विरोध झाला. आता याच नागपूर मेट्रोसाठी सोमवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ५,९७६ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही मोठी घोषणा केली.
देशात २०१४ मध्ये मोदी सरकार स्थापन झाले. त्यानंतर देशातील काही प्रमुख शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला. त्यामध्ये दुसऱ्या टप्पात नागपूरचा क्रमांक लागला. माझी मेट्रो हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ८ हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला आजच्या बजेटमध्ये दुसऱ्या फेजसाठी फरी निधी मंजूर झाला आहे.
नागपूर मेट्रोचा विस्तार ऑटोमॅटीव्ह चौकातून पुढे कामठीपर्यंत, मिहानपासून पुढे बुटीबोरीपर्यंत तर लोकसेवानगरपासून पुढे हिंगणा या गावापर्यंत करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आजच्या घोषणेमुळे मेट्रोच्या कामांना अधिक गती मिळणार आहे. मागील बजेटमध्ये नागपूर मेट्रोसाठी ४०० कोटी रुपये देण्यात आले होते.
स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू झाल्यानंतर काही वर्षांतच लोकसंख्याही वाढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने स्मार्ट सिटी हा महत्वाकांक्षी प्रकल्प होत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा जास्तीत जास्त नागरिकांना फायदा व्हावा, या दृष्टीने आणखी काही बदल करण्याची आवश्यकता आहे.
नागपूरसाठी मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा झाला आहे. मात्र, काहींनी मेट्रोला बदनाम करण्यासाठी ‘फार्स’ केला. ज्यांनी हे कृत्य केले त्यांनी शहराच्या लौकिकाला काळिमा फासण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींची समाजाने दखल घ्यावी, अशा शब्दात केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी संताप व्यक्त केला होता. मेट्रोचे काम उत्तम आहे. मेट्रोला वाढदिवसासाठी भाड्याने देण्याचा सल्ला मीच दिला होता. यातून गरीब लोकांना आनंदोत्सव साजरा करता यावा, हा हेतू आहे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
शहराचे आज जे चित्र बघायला मिळत आहे, त्याचे श्रेय केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीला आहे. यापूर्वी रिंग रोडच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी पैसा खर्च होत होता. परंतु, आता सिमेंट रस्त्यामुळे ५० वर्षे खड्डेच पडणार नाहीत. देशात सिमेंट रस्त्यांची संस्कृती गडकरी यांनीच रुजविली, असेह ते म्हणाले होते.
राज्यातील मेट्रो प्रकल्पांना बळ देणारी ही बातमी आहे. सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या फेजसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.