नागपूर - थॅलेसेमियाग्रस्त नंदिनीसाठी सीएसआर फंडातून १० लाख रुपयांची मदत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे झाली. आज या चिमुकलीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आभार मानले. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनसाठी १० लाखांचा खर्च येतो. या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च सीएसआर निधीतून करण्यात यावा, अशी शिफारस गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालय व आरोग्य मंत्रालयाला केली होती.
थॅलेसेमिया व सिकलसेल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विक्की रुघवानी यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री गडकरी यांना याबाबत निवेदन दिले होते. थॅलेसेमिया रुग्णांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी लागणारी रक्कम खूप जास्त असल्याने रुग्ण खर्च करू शकत नाही. बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन एकमेव उपाय या रुग्णांसाठी आहे, असे डॉ. रुघवानी यांंनी निवेदनात नमूद केले होते. त्यामुळे गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालय व आरोग्य मंत्रालयाला विनंती करून या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च सीएसआर निधीतून द्यावा, अशी शिफारस केली. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे कोल इंडियाने सीएसआरअंतर्गत कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल मुंबईची निवड केली.
नंदिनी ठरली नागपुरातील पहिली लाभार्थी
मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नंदिनीवर बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन करण्यात येणार आहे. येथे बोन मॅरोची प्रक्रिया करणाऱ्या रुग्णांना सीएसआरमधून १० लाखांची मदत दिली जाईल. नागपूरची नंदिनी या योजनेतून बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन प्रक्रियेसाठी पहिली लाभार्थी ठरली. आता तिच्यावर यशस्वी उपचार होण्याचा मार्ग मोकळा झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.