'तो' बिबट्या करतोय नागपूर दर्शन; महाराजबागेची केली सफर

'तो' बिबट्या करतोय नागपूर दर्शन; महाराजबागेची केली सफर
Updated on

नागपूर : उन्हाळा सुरू होताच वन्यजीव प्रेमी सफारीसाठी (Jungle safari) जंगलाकडे जातात. टाळेबंदीमुळे गेल्या दोन महिन्यापासून जंगले बंद असून वन्यजीव प्रेमी घरातच बंदीस्त आहेत. असे असताना चार दिवसापासून शहरात मुक्काम ठोकलेल्या बिबट्याने (Leopard in Nagpur) आज चक्क बजाज नगरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विश्राम गृह, कुलगुरू निवासस्थान आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालय (Maharajbag zoo Nagpur) परिसराची सफारी केली. त्याला पकडण्यासाठी चार पिंजरे (Camera and Cage Traps) लावले असून त्यात आठ कोंबड्या ठेवल्या आहेत. बिबट्याची भ्रमंती सुरू असल्याने नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. (unknown Leopard seen at Maharajbag in Nagpur)

'तो' बिबट्या करतोय नागपूर दर्शन; महाराजबागेची केली सफर
नागपुरात निर्बंध शिथिल! सर्व दुकानांची वेळ सकाळी ७ ते २

गायत्री नगर येथील नरेंद्र चकोले यांना शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजताच्या दरम्यान सर्वप्रथम बिबट्याचे दर्शन झाले. शनिवारी रात्री बिबट्याने व्हीएनआयटीच्या परिसरात मुक्काम ठोकला असावी किंवा परत अंबाझरी जैवविविधता उद्यानाकडे गेल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, रविवारी रात्री सव्वा दहा वाजता व्हीएनआयटीच्या परिसरातून थेट पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या दहा हेक्टर परिसरातील शेतात उडी मारल्याची माहिती पांडे नावाच्या एका व्यक्तीने वन विभागाला दिली.

त्यानुसार वन विभागाचे पथकाने तातडीने बजाज नगर आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मोकळ्या जागेसह त्या परिसरातील दोन्ही नाल्याची तपासणी केली. बिबट्याचा शोध लागला नाही. रविवारी रात्री १२.३० वाजता पीकेव्हीच्या विश्राम गृहाच्या सुरक्षा रक्षकाला बिबट्याचे दर्शन झाले. काही वेळ थांबल्यानंतर बिबट्या कुलगुरूंच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरुन उडी मारली. कुलगुरूंच्या घरांचा वळसा घालून दिसेनासा झाला असे सुरक्षा रक्षकाने सांगितले.

माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, त्यांना पुन्हा हुलकावणी दिली. नाल्या नाल्याने तो महाराजबाग परिसरात पोहोचला. दुपारी चार वाजताच्या दरम्यान, महाराजबाग परिसरातील मोगली गार्डनजवळ बिबट्या दिसल्याचे एका महिलेने सांगितले. वन विभागाने त्या परिसराचीही पाहणी केली. मात्र, कोणताही ठोस पुरावा आढळला नाही.

'तो' बिबट्या करतोय नागपूर दर्शन; महाराजबागेची केली सफर
'मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या'

पिंजऱ्यात कोंबड्या

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने महाराजबाग आणि पीकेव्ही विश्राम गृह, व्हीएनआयटीसह चार ठिकाणी पिंजरे लावले आहेत. त्यात कोंबडया ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महाराजबाग प्राणीसंग्रहालयाजवळील नाला, पीकेव्ही विश्राम गृहाजवळ आज कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत.

'तो' बिबट्या करतोय नागपूर दर्शन; महाराजबागेची केली सफर
'मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या'

(unknown Leopard seen at Maharajbag in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()