१५ ऑगस्टपासून सर्व दुकाने दहा वाजेपर्यंत; अशी आहे नियमावली

१५ ऑगस्टपासून सर्व दुकाने दहा वाजेपर्यंत; अशी आहे नियमावली
Updated on

नागपूर : शहरातील दुकानाबाबतचे निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले आहे. आता सर्व दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु, शॉपिंग मॉलमध्ये दोन्ही डोज घेतले असेल तरच प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत दुकानांना रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा होती. नवे नियमांची १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

मागील ९ ऑगस्टपासून रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू करण्यात आले होते. परंतु, अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने आठ वाजेपर्यंतच सुरू होती. आज या दुकानदारांनाही दिलासा देत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नवे नियमावली जाहीर केली. सर्व दुकाने तसेच शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु, शॉपिंग मॉलमध्ये कोविड लसीचे दोन्ही डोज घेणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे.

१५ ऑगस्टपासून सर्व दुकाने दहा वाजेपर्यंत; अशी आहे नियमावली
यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...

इनडोअर खेळांसाठी खेळाडूंचेही दोन्ही डोज पूर्ण झालेले आवश्यक आहे. ब्युटी पार्लर, जिम, सलून, स्पाही रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहील. परंतु, क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी असेल. रेस्टॉरंट, उद्यानाबाबत जुनेच आदेश लागू आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. उद्यान दिवसभर सुरू राहील. शेती, बांधकामे नियमित सुरू राहील.

अशी आहे नियमावली

  • सर्व दुकाने, शॉपिंग मॉल रात्री १० पर्यंत

  • रेस्टॉरंट, बार, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, जिम रात्री १० पर्यंत (क्षमतेच्या ५० टक्के)

  • विवाह सोहळ्यात खुले प्रांगण असेल तर दोनशे जणांना परवानगी, हॉलमध्ये १०० लोकांना परवानगी

  • इनडोअर क्रीडा प्रकारासाठी खेळाडूंनी दोन्ही डोज आवश्यक

  • सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यंत (क्षमतेच्या ५० टक्के)

  • शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, जलतरण, नाट्यगृह, सिनेमागृह बंद

  • रविवारीही दुकाने राहणार सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.