शेतकऱ्याची पत्नीने जिंकलाय 'Celebrity India'चा खिताब, वाचा यशस्वी कहाणी

vaishali waghmare
vaishali waghmaree sakal
Updated on

उमरेड (जि. नागपूर) : एका छोट्शा खेड्यात राहून पतीकडून शेतीचं ज्ञान घेतेय. तालुक्याच्या ठिकाणी महिलांच्या शारीरिक विकासासोबतच त्यांना रोजगार निर्मिती कशी उपलब्ध करून देता येईल यावर काम करते. विशेष म्हणजे घर परिवार सांभाळत असताना तिने '२०२१ सेलिब्रिटी इंडियाच्या फर्स्ट रनर अप’ (celebrity india award) हा खिताब पटकाविला आहे. ही यशस्वी कहाणी आहे, उमेरड (umred nagpur) तालुक्यातील नवेगाव येथील वैशाली संजय वाघमारे यांची...

vaishali waghmare
जन्मदात्यांनी पोटच्या गोळ्यालाच विकले, विकत घेणाऱ्याने मेंढीपालनाला जुंपले

वैशाली शेतकरी कुटुंबातील होतकरू महिला आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी त्या ग्रामपंचायत सदस्य झाल्या. सलग दहा वर्षांपासून त्या ग्राम पंचायतीचे सदस्यपद भूषिवत आहेत. त्यांच्या कुटुंबाची ३० एकर शेतजमीन असून त्यात कापूस, सोयाबीन, मिरची व धान आदी पिके घेतली जातात. त्यांनासुद्धा शेतीची आवड असल्यामुळे पतीसोबत शेतात लक्ष देतात. ट्रॅक्टर चालवून शेतीच्या मशागतीच्या कामात पतीला मदत करतात. त्या गावातील जनतेच्या सतत संपर्कात राहून त्यांचे प्रश्न-समस्या जाणून घेतात. त्याचे निराकरण करण्याच्या सतत प्रयत्न करतात. यातूनच त्या मनातली समाजकार्याची आवड जपत असतात. भविष्यात त्यांना सरपंच होता आले तर संपूर्ण गाव डिजिटल करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच सर्व सोयीसुविधायुक्त करून गावातील प्रत्येक मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना स्वावलंबी बनण्यास प्रेरित करतील. त्यांच्यासाठी रोजगारनिर्मिती करणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

वैशाली यांच्या लग्नाला २५ पूर्ण झाली असून त्या २० वर्षाच्या मुलीची आई आहे. त्या उत्कृष्ट झुंबा नृत्यप्रशिक्षिका आहेत. जिम ट्रेनर आहेत. त्यांच्याकडे नित्यनेमाने ३० ते ३५ महिला शिकायला येतात. याशिवाय त्यांच्या नृत्यविष्कारातून जणू वीज लखलखते, इतक्या चपळतेने त्या नृत्यमुद्रा करतात. सध्या त्यांचे वास्तव्य उमरेड शहरात आहे.

वैशाली यांना मिळालेले पुरस्कार -

२०१३ चा मिसेस उमरेड, त्यानंतर नृत्यामध्ये महाराष्ट्रस्तरीय पुणे येथे तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार, २०१७ च्या ‘मिसेस महाराष्ट्र’ स्पर्धेत ‘सेकंड रनर अप’, २०१८ ला बँकॉक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत त्यांना ‘ब्राँझ मेडल’ मिळाले. नुकतेच ‘२०२१ सेलिब्रेटी इंडियाच्या फर्स्ट रनर अप’ हा खिताब व मुकुटाचा मान त्यांना मिळाला. या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर अवघ्या विदर्भात त्यांच्या नावाची चर्चा झाली.

महिलांनी त्यांच्यातील सुप्तगुणांना पुढे आणावे यासाठी माझे प्रयत्न आहेत. आजचे जग हे महिलांचे आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करावे या जिद्दीने मी कार्य करीत असते. पुढे चालून मला माझ्या गावाचे नेतृत्व करुन गावाचा कायापालट करायचा आहे.
-वैशाली संजय वाघमारे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.