Valentine Day : देहविक्रीचा व्यवसाय सोडून पूजा झाली संजयची अर्धांगिनी

दोन्ही मनांचे मिलन झाल्याने पूजाने देहविक्री सोडली
love
lovelove
Updated on

नागपूर : अनेकांच्या पोटावर लाथ मारणारा लॉकडाउनचा काळ. गंगाजमनाचा परिसर. सर्वत्र शुकशुकाट. देहविक्री करणारी पूजा (बदललेले नाव) कुणीतरी येईल या प्रतीक्षेत उभी. पण लॉकडाउनमुळे ग्राहक भटकेना. अशातच रस्त्यावर भेट झाली ती एका अनोळखी व्यक्तीची. दोघांच्याही मनाने प्रेमाची साद घातली. क्षणभराच्या सुखाऐवजी दोघेही कायमचे जवळ ओढले गेले. सोबत वेळ घालवणे अन् एकमेकांची काळजी घेणे सुरू झाले. ती देह विकत असूनही संजयने तिच्यावर खरे प्रेम केले. दोन्ही मनांचे मिलन झाल्याने पूजाने देहविक्री सोडली आणि ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या पर्वावर ते दोघेच एकमेकांचे आनंदयात्री बनले.

पूजाचे कुटुंब मुळचे ग्वालियरचे. तिची आई सेक्स वर्कर. गंगाजमनात देह विक्रय करीत होती. पूजा एकटीच मुलगी. वयात आल्यानंतर आईवडिलांनी विवाहाचा विषय काढला पण पूजाने नकार देत स्वतःहून देहविक्री करण्याचे ठरविले. परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. कोरोना आला. सारे शहर लॉकडाउन झाले. गंगा जमनात ग्राहक भटकत नव्हते. संकटाचा काळ. पैशाची अडचण. अशावेळी संजय मदतीसाठी धावून आला. पूजाची भेट झाली. आकर्षण वाढले. तिच्या प्रेमात पडला.

love
भीषण अपघातात अख्ख कुटुंब ठार; कारचा टायर फुटल्याने घडला अनर्थ

परंतु, देहविक्रीच्या (Prostitution) चक्रव्यूहातून बाहेर पडणे सोपे नव्हते. यामुळेच डोक्यातील लग्नाचा विचार तिने ओठावर आणला नाही. परंतु, संजयने लग्नाची पूजा मांडू या काय? असा प्रेमळ प्रश्न प्रेमदिनाच्या पर्वावर विचारला आणि तीच्या मुखातून नकळत होकार आला. परंतु, एकवेळ ती भेदरली होती. तब्बल पाच वर्षे शरीर विकले असल्याचे सांगितल्यानंतरही ‘सोडून दे हा व्यवसाय’ असे सांगून संजयने मन मोकळे केले. गंगाजमनाचा उंबरठा पूजाने ओलांडला. दोघांनी व्हॅलेंटाइन दिनाच्या (Valentine day) पर्वावर लपून छपून लग्न केले.

खाकी वर्दीने दिल्या शुभेच्छा

पूजा लग्न करून निघून गेली. कुटुंबाचा जगण्याचा आधार संपल्याने पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. मात्र, दोघांनीही वयाची तिशी ओलांडलेली. दोघेही समंजस. पोलिसांसमोर ते उभे झाले. लॉकडाउन काळातील प्रियकर आणि प्रेयसी लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाचे कागदपत्र दाखवल्यानंतर खाकी वर्दीनेही त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. पूजाच्या कपाळावर संजयच्या नावाचे कुंकू सजले. नियतीनेच आयुष्य उध्वस्त केले आणि नियतीनेच सुखाचे क्षण दिले. पूजाच्या अश्रूंची फुले झाली. दोघांचाही आता राजाराणीचा सुखी संसार सुरू आहे.

love
WHO प्रमुख म्हणाले, ...तर जून ते जुलैपर्यंत कोरोनाचा तीव्र टप्पा संपू शकतो
पहिल्या लॉकडाउनमध्ये त्या दोघांची भेट झाली. भेटीचे रूपांतर कधी प्रेमात झाले, कळले नाही. आम्हालाही माहीत नव्हते. कालांतराने ते कळले. त्यांना मदत केली. सुखी संसार सुरू आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांना योग्य साथीदार मिळाला तर त्या स्वतःच या व्यवसायातून दूर होतात.
- हेमलता लोहवे, प्रकल्प समन्वयक, रेडक्रॉस, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.