Nagpur News : प्रवासी संख्‍या वाढून ही वंदे भारतचा प्रवास महागच; नागपूर-बिलासपूरच्या प्रवाशांची अपेक्षा धुळीस

गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे.
Vande Bharat Express
Vande Bharat ExpressSakal
Updated on

अखिलेश गणवीर

Nagpur - नागपूर-बिलासपूर वंदे भारतची प्रवासी क्षमता शंभर टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या गाडीचे तिकीट स्वस्त होण्याची शक्यता धूसर आहे. मोठा गाजावाजा करून वंदे भारत सुरू केली. तेव्हा १६ डब्ब्यांची ही गाडी होती. प्रतिसाद कमी असल्याने १६ वरून ८ डबे करण्यात आले. पण आता प्रवासी संख्या जास्त असल्याचे कारण पुढे करून तिकीट दर स्वस्त होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वंदे भारतसह सर्व गाड्यांचे एसी चेअर कार, एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार असल्याचे रेल्वे बोर्डाने जाहीर केले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये जास्तीत जास्त जागांचे आरक्षण व्हावे, यासाठी भाड्यात ही कपात केली जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले. गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे. अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या विविध झोनला सांगितले आहे.

Vande Bharat Express
Nagpur : १८ वर्षांखालील ११ मुली झाल्या ‘आई’

नागपूर-बिलासपूर वंदे भारत डिसेंबर २०२२ मध्ये सुरू केली तेव्हा १६ डब्यांची होती. नंतर १७ मे २०२३ पासून ती ८ डब्याची करण्यात आली. ही गाडी १६ डब्यांची असताना प्रवाशांची संख्या कमी असल्याने आरक्षण सहज मिळत होते. मात्र, प्रतिसाद कमी होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नुकसान कमी करण्यासाठी व प्रवासी संख्या जास्त दाखविण्यासाठी १६ वरून ८ डब्यांची गाडी केली. आता प्रवाशांना आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. आठही डब्यात प्रवासी संख्या जास्त असल्याने वेटिंग वाढली आहे.

Vande Bharat Express
Nagpur Crime : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेप

सवलत मिळण्याची अपेक्षा फोल

या गाडीत एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. एसी चेअर कारचे भाडे १ हजार २४० तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे २ हजार २४० रुपये आहे. या गाडीचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवासात सवलत मिळेल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, प्रवाशांची संख्या (आक्यूपेंसी) जास्त असल्याचे कारण पुढे करीत नागपूर-बिलासपूर व बिलासपूर-नागपूर वंदे भारतचे तिकीट दर कमी होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Vande Bharat Express
Nagpur News - ई-बसनंतर महापालिकेत ई-टॅक्सी अधिकाऱ्यांसाठी २५ वाहने भाड्याने : प्रशासनावर अतिरिक्त भुर्दंड

नागपूर-बिलासपूर वंदे भारतसह आमच्या कोणत्याच गाड्यात प्रवासी संख्या कमी नाही. त्यामुळे तिकीट दर कमी होण्याची शक्यताच नाही.

-साकेत रंजन, मुख्य जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे

नागपूर-बिलासपूर व बिलासपूर-नागपूर या दोन्ही गाड्यांची प्रवासी संख्या अनुक्रमे ११७ आणि ११५ टक्के आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे या गाडीचे भाडे स्वस्त होणार नाही.

- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी- मध्य रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()