Wardha: चाइल्ड पोर्नोग्राफी साहित्याची ऑनलाइन विक्री करणारा पोलिसांच्या अटकेत ! शंभर रुपयांत विकायचा दोन टीबी डाटा

लहान मुलांच्या लैगिंक शोषणासंबंधीचे व्हिडिओ नाइट रायडर या नावाने टेलिग्राम चॅनेलवर विकणाऱ्या युवकाला सायबर पोलिसांना अटक केली.
Wardha: चाइल्ड पोर्नोग्राफी साहित्याची ऑनलाइन विक्री करणारा पोलिसांच्या अटकेत ! शंभर रुपयांत विकायचा दोन टीबी डाटा
Updated on

Vardha Pornogrpahy Selling: लहान मुलांच्या लैगिंक शोषणासंबंधीचे व्हिडिओ नाइट रायडर या नावाने टेलिग्राम चॅनेलवर विकणाऱ्या युवकाला सायबर पोलिसांना अटक केली. ओम राजेंद्र डहाके (वय २३), रा. नाचणगाव, जि. वर्धा याला धामणगाव असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिस अधीक्षकांनी सुरू केलेल्या वूमन सेफ्टी विंग व शी- भरोसा सायबर लॅब, तेलंगाणा यांच्याकडून पुलगाव पोलिस ठाणे हद्दीतील ओम डाहाके हा लहान मुलांचे लैंगिक शोषणासंबंधीचे व्हिडिओ नाईट रायडर नावाचे टेलिग्राम चॅनेलवर प्रसारित करून शंभर रुपयांमध्ये दोन टी.बी. डाटा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीवर तत्काळ कारवाई करण्याकरिता वर्धा सायबर सायबर ठाण्याचे पोलिस रवाना झाले. त्यांनी संशयिताचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स, चॅटिंग, आय. पी. अॅड्रेस, डिव्हाईस आयडी, फेसबुक अकाऊंट लिंक, बँक अकाऊंट व यू.पी.आय. ईमेल, फोटो अशी माहिती संकलित करून संशयित ओम यास अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथून ताब्यात घेतले.

सदर व्यक्तीजवळ मिळून आलेल्या मोबाईलची तपासणी केली असता टेलिग्राम चॅनल याच मोबाईलवरून चालवत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन व अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, हवालदार नीलेश कट्टोजवार, वैभव कट्टोजवार, नीलेश तेलरांधे, कुलदीप टांकसाळे, अनुप राऊत, विशाल मडावी, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, अमित शुक्ला, अंकित जिभे, प्रतीक वांदिले, स्मिता महाजन, लेखा राठोड यांनी केली. (Latest Marathi News)

Wardha: चाइल्ड पोर्नोग्राफी साहित्याची ऑनलाइन विक्री करणारा पोलिसांच्या अटकेत ! शंभर रुपयांत विकायचा दोन टीबी डाटा
Caste Validity: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना दिलासा! जात वैधता प्रमाणपत्रांसाठी देण्यात आली इतकी मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.