Nagpur News : ‘वर्षा’ बंगल्यात शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करणार; रविकांत तुपकरांच्या घोषणेने खळबळ

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही दखल सरकार घेत नाही.
sakal
Ravikant TupkarRavikant Tupkar
Updated on

नागपूर - केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तरीही दखल सरकार घेत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्येचे प्रात्यक्षिक करून दाखवू, अशी घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज पत्रपरिषदेत केली. यामुळे खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता.२३) या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.