Prakash Ambedkar: 'मोदींना हटवले नाहीतर...'! प्रकाश आंबेडकरांनी वर्तवली भिती, आघाडीला दिला 'हा' इशारा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींबाबत भाकीत वर्तवलं आणि आघाडीला सल्लाही दिला.
Prakash Ambedkar: 'मोदींना हटवले नाहीतर...'! प्रकाश आंबेडकरांनी वर्तवली भिती, आघाडीला दिला 'हा' इशारा
Updated on

Prakash Ambedkar on PM Narendra Modi: ‘इंडिया’ आघाडीतील सर्वच पक्षांचे लक्ष्य भाजपला पराभूत करणे आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आघाडीने छोट्या-छोट्या पक्षांना उमेदवारी नाकारून आपले लक्ष्य विसरू नये, अन्यथा एक दिवस विरोधातील सर्वच नेते तिहार जेलमध्ये दिसतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.


कस्तूरचंद पार्कवर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या स्त्री मुक्ती दिन परिषदेत ते बोलत होते. ज्याच्या हाती देशाची सत्ता असते त्यानुसारच देश चालतो. परिवर्तनासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सामाजिक भेद अधिक तीव्र केले जात आहेत. तशी व्यवस्थाही केली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नागपूरचे भूत असे संबोधून प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र हे लोक आमचेच नुकसान करण्याचा प्रयत्नात आहेत. केंद्रात सत्ता परिवर्तनासाठी इंडिया आघाडीला सर्व सहकाऱ्यांना एकत्र करावे लागले. पण जागा वाटप करताना आपले लक्ष्य विचलित होता कामा नये. चार-दोन जागा कमी पदरात पडल्या तरी चालेल मात्र भाजप कुठल्याही परिस्थिती निवडून येणार नाही याची दक्षता घ्यावी लागले, असेही ते म्हणाले.

दबावाला झुगारा
लोकसभेची निवडणूक बघता दबाव व ब्लॅकमेलिंगचे राजकारण केले जात आहे. महाविकास आघाडी तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आधी ईडी, सीबीआयचा धाक दाखवण्यात आला. आता कारवाई थांबवण्यात आली आहे. हा दबावाचाच एक भाग आहे. या खेळाला महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणून घ्यावे लागले. संविधानाला मानणाऱ्या सर्व विचारधारांच्या पक्षांनी देशात सत्ता आणण्यासाठी एकजूट व्हावे लागणार आहे. याकरिता सर्वांचे सहकार्य घ्यावे आणि द्यावे लागणार असल्याचे आंबेडकर यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar: 'मोदींना हटवले नाहीतर...'! प्रकाश आंबेडकरांनी वर्तवली भिती, आघाडीला दिला 'हा' इशारा
Earthquake News : भल्या पहाटे लेह-लडाखमध्ये भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेची नोंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.