Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे लक्ष्य, १८ महिने निर्णय प्रलंबित ठेवल्याचा उदय सामंत यांचा आरोप

वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी बोथड झाल्याचे दिसत असताना आज विधानसभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे लक्ष्य, १८ महिने निर्णय प्रलंबित ठेवल्याचा उदय सामंत यांचा आरोप
Updated on


Vedenta Foxconn Project Uday Samant: वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी बोथड झाल्याचे दिसत असताना आज विधानसभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. वेदातांचा फॉक्सकॉन प्रकल्प आमच्या सरकारमुळे नव्हे तर १८ महिने निर्णय प्रलंबित ठेवल्याने गेल्याचे त्यांनी सांगितले.


विधानसभेत पुरवणी मागण्याच्या चर्चेनंतर उद्योग विभागाच्या ३ हजार कोटींच्या मागण्या सादर करताना ते बोलत होते. या प्रकल्पासाठी निर्णय घेण्याची गरज असताना मागील सरकारने १८ महिने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक घेण्यात आली नाही. या उपसमितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यांच्यापुढेच अटी आदी ठरतात.

ही बैठक ऑनलाईनही शक्य होती, असे नमुद करीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाच्या मालकांशी चर्चा केली. परंतु त्यांनी १८ महिने निर्णय न घेणाऱ्या राज्यात यायचे नाही, असे सांगितले होते. याशिवाय गुजरातने त्यांना जास्त सुविधा देण्याची तयारी दर्शविली होती, असेही ते म्हणाले.

शिंदे सरकार आल्यानंतर तीन उपसमितीच्या बैठकीत १ लाख २७ हजार कोटींचे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे असून यातून १ लाख ६० हजार रोजगार निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भात ४१ हजार २२० कोटींचे प्रकल्प मंजूर झाले असून ३२ हजार रोजगार निर्माण झाल्याचे ते म्हणाले. (Latest Marathi News)

Vedanta Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्पावरून उद्धव ठाकरे लक्ष्य, १८ महिने निर्णय प्रलंबित ठेवल्याचा उदय सामंत यांचा आरोप
Nagpur Blast : नागपूरमध्ये सोलार एक्स्प्लोझिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.