नागपूर : पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून आंतरवासितेच्या नोंदणीसाठी अठरा हजार रुपये आकारले जाणार आहे.
Nagpur Veterinary College
Nagpur Veterinary CollegeSakal
Updated on

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या (MAFSU) पशुवैद्यकीय महाविद्यालयातील (Veterinary College) अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून (Student) आंतरवासितेच्या नोंदणीसाठी अठरा हजार रुपये आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण वर्षात विद्यार्थ्यांची कुठलीही शैक्षणिक कृती होत नसल्याने या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात साडेपाच वर्षांच्या पशुचिकित्सा विज्ञान व पशुसंगोपन (बीव्हीएसई ॲण्ड एएच) या पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेतात. या साडेपाच वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीची साडेचार वर्षे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करायवयाचा असतो. यानंतर शेवटच्या एका वर्षात राज्यात आणि बाहेरील राज्यांतील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये आंतरवसिता अंतर्गत सेवा देणे बंधनकारक आहे.

Nagpur Veterinary College
शीना बोरा जीवंत असल्याचा दावा किती खरा? फॉरेन्सिक अहवालामधून समोर आले सत्य

या संपूर्ण वर्षात विद्यार्थ्यांची कुठलीही शैक्षणिक कृती राहत नाही. केवळ आंतरवसिता संपल्यावर विद्यार्थ्यांना शेवटी व्हायवा सादर करावा लागतो. मात्र, शैक्षणिक कृती नसतानाही विद्यार्थ्यांना चौदा हजार रुपये शिकवणी शुल्क, १ हजार नोंदणी आणि ३ हजार ५०० रुपये परीक्षा असे १८ हजारांवर रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

साडेचार वर्षांमध्ये विद्यार्थी संपूर्ण शुल्क भरतात. मात्र, शेवटच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात कुठलीही शिकवणी नसतानाही शैक्षणिक शुल्क का द्यावे? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाला ग्रामीण आणि शेतकरी कुटूंबातील विद्यार्थी असतानाही विद्यापीठ व सरकारकडून त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला आहे.

Nagpur Veterinary College
दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

विशेष म्हणजे आंतरवसिता वर्षात विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्तीही लागू होत नसल्याने संपूर्ण शुल्काचा भूर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. तर २०१९ पासून या शुल्कात वाढ करून २५ हजार रुपये करण्यात आल्याने पुढील वर्षातील विद्यार्थ्यांवर अधिकचा आर्थिक भूर्दंड बसणार आहे.

विद्यार्थ्यांकडून आंदोलन

महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुल्कवसुलीच्या विरोधात गुरुवारी (ता.१६) महाविद्यालयाच्या मुख्यालयासमोर आंदालन करण्यात आले. अंतिम वर्षाला आंतरवसिता (इंटर्नशीप)काळात विद्यार्थी शासकीय व निमशासकीय संस्थामध्ये सेवा देतात. यादरम्यान महाविद्यालयामध्ये कुठल्याही शैक्षणिक कृती होत नसतानाही त्यांच्याकडून या वर्षसाठी चौदा हजार रुपयांचे शिकवणी शुल्क आकारले जात असल्याने विद्यार्थ्यांचा याला विरोध होत आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशदाराला टाळे लावत प्राध्यापकांनाही प्रवेश नाकारला हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.