Ration Black Marketing: रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची छापा टाकून कारवाई

Action by raiding District Supply Officers: रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी छापा टाकून शिरपूर येथे कारवाई केली आहे. सदर कारवाईमुळे रेशन माफीयांचे धाबे दणाणले आहे.
Ration Black Market
Ration Black MarketSakal
Updated on

Washim Ration Black Marketing News: रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी छापा टाकून शिरपूर येथे कारवाई केली आहे. सदर कारवाईमुळे रेशन माफीयांचे धाबे दणाणले आहे.


शिरपूर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर येथे रेशन धान्याचा काळाबाजार करून सदर धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजश्री कोरे यांना प्राप्त झाली होती.

दिनांक २१ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या पथकाने शिरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेलगाव बगाडे रोडवरील पोल्ट्री फार्मवर धाड टाकली. दरम्यान आरोपीच्या ताब्यामध्ये असलेला रेशनचा ९ क्विंटल ९१ किलो गहू जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मालेगाव तहसीलचे प्रभारी निरीक्षक अमोल बाबुराव देशमुख यांनी २४ जानेवारी रोजी शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.(Latest Marathi News)

त्यांच्या फिर्यादीवरून शिरपूर येथील रहिवासी असलेले अख्तर अली मियाज अली सय्यद या इसमाविरुद्ध शिरपूर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पो. नि. रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये सपोनी महेश मछले करीत आहेत.

Ration Black Market
Pune Crime News: संतापजनक! वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाण्याने फसवलं! अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार

दिवसाढवळ्या रेशनच्या काळ्या धान्याची वाहतूक


मालेगाव तालुक्यामध्ये गोरगरिबांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा काळाबाजार करून राजरोसपणे रेशन माफिया डल्ला मारत आहेत. दिवसाढवळ्या शिरपुरातून या धान्याची मालवाहू गाडीमध्ये वाहतूक होत आहे. संबंधित यंत्रणेची मुकुसंमती असल्याने सदर प्रकार घडत असल्याची जोरदार चर्चा आहे. (Latest Marathi News)

Ration Black Market
PM Modi on Budget: विरोधकांना रामराम म्हणत मोदींनी बजेटबद्दल केला मोठा खुलासा, "नव्या सरकारमध्ये..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.