Bhavana Gawali : खासदार गवळी आजपासून प्रचारात दिसतील ; मुख्यमंत्री

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी या उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचारात सहभागी झाल्या नव्हत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुरुवारी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली.
Bhavana Gawali
Bhavana Gawali sakal
Updated on

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी या उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचारात सहभागी झाल्या नव्हत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गुरुवारी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली. त्या उद्या शनिवारपासून प्रचारात सहभागी होतील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुकांची आचारसंहिता सुरू असली तरी माझे अवकाळी पावसाच्या नुकसानीवर पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पत्रकार परिषदेला पालकमंत्री सजंय राठोड, आमदार मदन येरावर, खासदार हेमंत पाटील, आदमार अशोक ऊइके, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, नितीन भूतडा, जीवन पाटील आदि उपस्थित होते.

Bhavana Gawali
Loksabha Election 2024 : न्यायाची हमी देणारा दस्तावेज ; काँग्रेसने मांडले ‘नवसंकल्प आर्थिक धोरण’

बुलढाण्यात आज मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या १४ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या दरम्यान ते बुलढाणा शहरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.